धडाडीच्या हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांचा परिचय
१. पुणे आणि सातारा : पुणे येथील सर्वश्री युवराज पवळे, सुयोग गोंधळेकर, दीपक जाधव हे धर्मशिक्षण वर्ग घेतात, तसेच साधनाही करतात. सातारा येथील सर्वश्री आेंकार डोंगरे, शिवराज तलवार, किरण मोरे, संभाजी कदम हे ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’च्या धारकर्यांना प्रत्येक मोहिमेत साधना सांगतात, तसेच ते स्वत: साधना करतात आणि त्यांनी त्यांच्या कुटुंबियांनाही साधना सांगितली आहे.
पुणे आणि सातारा येथील हिंदुत्वनिष्ठांची ओळख समितीचे पुणे जिल्हा संघटक श्री. अभिजित देशमुख यांनी उपस्थितांना करून दिली.
२. जळगाव आणि नंदुरबार
२ अ. जळगाव :
१. येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. विनोद शिंदे यांचा एक पाय अधू आहे, तर दुसरा पाय केवळ २५ टक्के कार्य करतो. असे असूनही त्यावर मात करत ते हिंदुत्वाचे कार्य करतात. जळगाव येथे झालेल्या धर्मजागृती सभांच्या वेळी त्यांनी ६० गावांत प्रसार केला आणि तेथील धर्माभिमान्यांना धर्मजागृती सभेला येण्यात उद्युक्त केले.
२. जळगाव येथील श्री. हिरामण वाघ यांना सायंकाळी अंधार पडल्यानंतर केवळ १०-२० टक्केच दिसते, तरीही ते प्रतिदिन सायंकाळी धर्मप्रसार करतात. त्यांनी ४५ गावांमध्ये धर्मप्रसाराचे कार्य चालू केले आहे. समितीचे श्री. प्रशांत जुवेकर यांनी या धर्मप्रेमींची ओळख करून दिली.
२ आ. नंदुरबार : येथील डॉ. नरेंद्र पाटील हे अपंग आहेत; मात्र भगवान श्रीकृष्ण आणि परात्पर गुरुडॉ. आठवले यांच्यावर श्रद्धा ठेवून गोरक्षण आणि लव्ह जिहाद यांच्या विरोधात ते सक्षमतेने कार्य करतात. त्यांनी नंदुरबारमधील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची समन्वय समिती स्थापन केली आहे आणि त्या माध्यमातून शास्त्रानुसार गणेशोत्सव साजरा करण्यास ते सांगत आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात