-
सोलापुर मध्ये अधिकाऱ्याना आतंकवादी संघटनांनी धमकी दिल्याचे प्रकरण !
-
सोलापुरात युवा सेना देणार अधिकाऱ्याना संरक्षण !
सोलापूर : शिवरायांच्या विचारांचे हे राज्य असून, अशा प्रकारच्या धमक्या देण्यापूर्वी प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या थडग्याचा त्यांनी विचार करावा आणि मगच आपली शक्ती दाखवावी, असे आवाहन युवा सेनेचे जिल्हा सचिव सुमित साळुंखे यांनी दिले.
‘अल-कायदा’ आणि इसिस यांच्या नावाने निनावी पत्राद्वारे पालकमंत्री विजयकुमार देशमुख, जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे, मनपा आयुक्त विजयकुमार कळम-पाटील, दैनिक सुराज्यचे संपादक यांच्यासह अधिकाऱ्याना धमकी देणाऱ्याच्या विरोधात मंगळवारी युवा सेनेने आक्रमक पाऊल उचलत इसिसचा निषेध नोदवला आणि ‘युवा सेना अधिकाऱ्याना संरक्षण देईल’, असे सांगितले. (आतंकवाद्यांच्या विरोधात लढण्यासाठी पुढे आलेल्या युवा सेनेचे अभिनंदन ! अन्य राष्ट्राभिमान्यांनीही त्यांच्याकडून बोध घ्यावा. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
चार हुतात्मा पुतळ्यासमोर युवा सेनेच्या वतीने विठ्ठल वानकर यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. या वेळी सुमित साळुंखे बोलत होते. या वेळी युवा सेनेचे शहरप्रमुख सर्वश्री बालाजी चौगुले, विकी सुर्यवंशी, अमर बोडा, रवी कोकूल, कृष्णा गेजगे यांच्यासह युवा सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात