बीजिंग – चीनच्या शिनजियांग प्रांतातील १०० हून अधिक उघूर मुसलमानांना सरकारी नियमांचे उल्लंघन करत रोजा ठेवल्याने दंड आणि शिक्षा ठोठवण्यात आली आहे. शिक्षा करण्यात आलेल्यांमध्ये काही शेतकरी, तर काही सरकारी कर्मचारी आहेत. पोलीस, नागरिक, सुरक्षादल आणि अन्य सुरक्षायंत्रणा येथील मुसलमान शेतकर्यांना त्यांच्या शेतात जाऊन या काळात खाण्यापिण्याचे पदार्थ देत आहेत. तसेच येथील हॉटेल्स बंद ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे. शिनजियांग प्रांतात ४५ टक्के मुसलमान आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात