एन्.सी.ई.आर्.टी.कडून देवता आणि संत यांचा अवमान !
वारकरी संप्रदाय आणि हिंदुत्ववादी संघटना यांच्यात संतापाची लाट
हिंदूंनो, हिंदूंच्या पुढच्या पिढीला त्यांचा जाज्ज्वल्य इतिहास कळू नये, यासाठीचे हे षड्यंत्र आहे, हे जाणा ! ही स्थिती अशीच राहिली, तर या शिक्षणक्रमामुळे भारताचेही हिरवेकरण व्हायला वेळ लागणार नाही. शिक्षणाचे हिरवेकरण रोखण्याची केंद्र आणि राज्य शासनाकडे मागणी करा !
नागपूर : राष्ट्रीय शिक्षण, संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (एन्.सी.ई.आर्.टी.च्या) पाठ्यपुस्तकात महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठलासह येथील संत परंपरेचा अवमान करणारा उल्लेख करण्यात आला आहे. श्री विठ्ठलाचा उल्लेख विट्ठल, संत ज्ञानेश्वरमाऊलींचा उल्लेख जणेश्वर, संत चोखामेळा यांचा उल्लेख चोखमेला, तर संत सखुबाई यांचा उल्लेख सक्कूबाई असा चुकीचा आणि एकेरी केला आहे. या विरोधात संपूर्ण वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी संघटना यांच्यात संतापाची लाट उसळली आहे.
१. इयत्ता ७ वीच्या हमारे अतीत-२ या पुस्तकातील पृष्ठ क्रमांक १०८ वर ही घोडचूक करण्यात आली आहे.
२. याच पुस्तकात भारतीय संस्कृतीविषयी खोटी आणि अवमानकारक माहिती देणारे, छत्रपती शिवाजी महाराजांना नगण्य स्थान देणारे आणि हिंदुद्वेष निर्माण करणारे लिखाण करण्यात आले आहे.
३. एन्.सी.ई.आर्.टी.च्या या हिंदुद्रोहाविषयी हिंदु जनजागृती समितीने माहिती दिल्यानंतर १७ डिसेंबरला विधानभवनासमोर शिवसेना आणि भाजप यांच्या आमदारांनी तीव्र निदर्शने केली.
४. सदर अभ्यासक्रम त्वरित पालटण्यात यावा, अशी मागणी एका निवेदनाद्वारे समितीच्या वतीने शालेय आणि उच्च शिक्षण मंत्री श्री. विनोद तावडे यांच्याकडे करण्यात आली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात