Menu Close

लव्ह जिहाद : धर्मांध प्रियकराच्या मदतीने विवाहीत हिंदु महिलेने केला पतीचा खून

श्रीरामपूर : तालुक्यातीलनाऊर येथे पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. पत्नीसह प्रियकरास पोलिसांनी अटक करून शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना न्यायालयाने २७ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

नंदू दामू पवार वय (५५) असे मृताचे नाव असून त्यांची पत्नी रंजना नंदू पवार, तिचा प्रियकर अकबर शहाबुद्दिन शेख (शिरसगाव, ता. श्रीरामपूर) यांचे सात ते आठ वर्षांपासून अनैतिक संबंध होते त्यावरून रंजना नंदू या पती-पत्नीमध्ये अनेक वेळा भांडणे होत असे.

बुधवारी आरोपी रंजना पवार आणि अकबर शेख यांनी नंदू पवार यास लाकडी दांडा लोखंडी फुकणीने डोक्यात छातीवर, हात, पायावर खुप मारहाण करून जागीच ठार केले. या प्रकरणी चंद्रभागा वालचंद काळे (६०, फरगडे वस्ती, गोंधवणी) या महिलेने तालुका पोलिसात फिर्याद दिल्यावरून आरोपी रंजना पवार व अकबर शेख यांना अटक करून शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता २७ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अधिक तपास पोलिस निरीक्षक वसंत पथवे करत आहेत.

संदर्भ : दिव्य मराठी

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *