Menu Close

पाकव्याप्त पंजाबमध्ये ऑईल टँकरचा स्फोट, शेकडो नागरिकांचा मृत्यू

दिल्ली : पाकिस्तानमध्ये ऑईल टँकरच्या आगीमुळे झालेल्या स्फोटात शंभरहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पाकव्याप्त पंजाबमध्ये आज रविवारी सकाळी बहावलपूर शहराजवळ हा अपघात झाला.

चालकाचा टँकरवरील ताबा सुटल्यानं टँकर पलटी झाला. पलटी झाल्यावर टँकरमधून वाहणारे तेल जमा करण्यासाठी आसपासच्या परिसरातील नागरिकांनी टँकरजवळ गर्दी केली. मात्र अचानक टँकरला आग लागली आणि त्याचा स्फोट झाला. या आगीत शेकडो लोकांचा होरपळून मृत्यू झाला.

या आगीत मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. स्फोटात भाजलेल्या अनेकांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृतीही गंभीर असल्याचे स्थानिक माध्यमांनी स्पष्ट केले आहे. या आगीत ६ कार आणि १२ मोटरसायकल जळून खाक झाल्या आहेत. आगीत जळालेल्या मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.

संदर्भ : एबीपी माझा

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *