Menu Close

हिंदु जनजागृती समितीने दिलेल्या निवेदनांचे विषय विधानसभेत मांडणार ! – श्री. नरेंद्र पवार, आमदार, भाजप

डावीकडून १. श्री. नरेंद्र पवार, २. श्री. राजन चौधरी, ३. श्री. राकेश गोडांबे, ४. श्री. अजय संभूस, ५. श्री. माधव साठे

कल्याण : डॉ. झाकीर नाईक यांच्या शाळेवर कारवाई करावी आणि महाराष्ट्रात इतर राज्यांप्रमाणे धर्मांतर बंदी कायदा लागू करावा, या आणि इतर मागण्याचे निवेदन कल्याणचे भाजपचे आमदार श्री. नरेंद्र पवार यांना देण्यात आले. या वेळी श्री. पवार म्हणाले, हिंदु जनजागृती समितीचे कार्य मला ज्ञात आहे. समितीचे विषय चांगले आणि अभ्यासपूर्ण असतात. तुम्ही दिलेल्या निवेदनांचा सकारात्मक विचार करून विधानसभेत मांडू, असे आश्वाससन त्यांनी या वेळी समितीच्या प्रतिनिधींना दिले. यापुढेही हिंदुत्ववासाठीच कार्य करणार, असे ते या वेळी म्हणाले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. राकेश गोडांबे, श्री. अजय संभूस, श्री. माधव साठे, बजरंग दलाचे श्री. राजन चौधरी, तसेच भाजप महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *