श्री. प्रमोद मुतालिक वगळता एकतरी हिंदुत्वनिष्ठ नेता किंवा एखादी संघटना या घटनेच्या विरोधात बोलली आहे का ? – संपादक, हिंदुजागृति
उडुपी (कर्नाटक) : श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी २६ जून या दिवशी उडुपी येथे श्रीकृष्ण मठात आयोजित इफ्तारच्या मेजवानीविषयी पेजावर स्वामी यांची भेट घेऊन तीव्र निषेध व्यक्त केला. त्याचबरोबर श्री. मुतालिक यांनी स्वामीजींना भविष्यकाळात मठामध्ये असे कार्यक्रम न ठेवण्याचे आवाहन केले. पेजावर स्वामीजींनी मात्र मठाच्या वतीने आयोजित इफ्तारच्या मेजवानीचे समर्थन केले. तसेच आम्ही नेहमीच मुसलमानांना मान दिला आहे आणि मठाच्या अनेक उपक्रमात मुसलमानांनी सहकार्य केले आहे, असे सांगितले.
श्री. मुतालिक यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले की, पेजावर स्वामींनी गोहत्या करणार्या व्यक्तींशी केलेली जवळीक हा हिंदु समाजाचा अपमानच होता. मठाच्या आत इफ्तारची मेजवानी आयोजित करून धर्मांधांशी सौहार्दाचा सुसंवाद होतो का ? एखाद्या मशिदीच्या परिसरात हिंदूंच्या एखाद्या सणाचा उत्सव साजरा केला जातो का ? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात
२६ जून २०१७
उडुपी येथील श्रीकृष्ण मठात मुसलमानांसाठी इफ्तार आणि नमाज यांचे आयोजन
- हिंदू दाखवत असलेला हा सर्वधर्मसमभाव अन्य धर्मियांकडून कधी दिसून येतो का ?
- हिंदूंच्या धार्मिक स्थळी असे कार्यक्रम करणार्यांनी जिहादी आतंकवादाच्या विरोधात कार्यक्रम आयोजित करून मुसलमानांना बोलावल्यास ते येतील का, हेही पहावे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
उडुपी : श्री विश्वेथशतीर्थ स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली २४ जून या दिवशी श्रीकृष्ण मठाच्या वतीने सुमारे १५०-२०० मुसलमानांसाठी इफ्तार सौहार्द कुटा नावाने इफ्तार पार्टी आयोजित करण्यात आली. मठातील अन्नब्रह्म सभागृहामध्ये मुसलमानांनी त्यांचे रोजे सोडले. इफ्तारनंतर सहभागी मुसलमानांनी श्रीकृष्ण मठातील एका सभागृहात नमाजपठण केले.
श्री विश्वेलशतीर्थ स्वामींनी उपवास सोडण्यासाठी मुसलमानांना खजूर वाटप केले. काही लोकांच्या म्हणण्यानुसार मठात जेथे केवळ पुरोहितच जाऊ शकतात, अशा ठिकाणी मुसलमानांनी नमाज पठण केले.
या प्रसंगी उडुपी येथील अंजुमन मशिदीचे खतीब इफ्तिर इनायत्तुल्ला रिझवी, कर्नाटक अल्पसंख्यांक विकास महामंडळाचे अध्यक्ष एम्.ए. गफूर, काँग्रेस नेते आबिद अली, पेजावर स्वामीजी, इशातीर्थ स्वामीजी (कनिष्ठ), भाजप अल्पसंख्यांक शाखेचे रहिम उचील, कर्नाटक रक्षणा वेदिकेचे अंसार अहमद आणि इतर उपस्थित होते.
श्री विश्वेजशतीर्थ स्वामी यांनी या वेळी केलेल्या भाषणात, समाजात शांती निर्माण करण्याच्या आवश्यकतेवर जोर दिला आणि म्हणाले, आता समाजात अशांत वातावरण आहे; परंतु ते शांततेत पालटले पाहिजे. श्रीकृष्ण मठात झालेल्या या इफ्तारमुळे समाजात सौहार्द आणि शांतता पसरली पाहिजे. (हिंदूंच्या मठात सौहार्द आणि शांतता असतेच. अशीच शांतता आणि सौहार्द मशिदी आणि चर्च यांमध्येही व्हावी, असे स्वामीजींनी म्हणायला हवे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात