नागपूर विद्यापिठाचा हिंदुद्रोही कारभार !
नागपूर : येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापिठातील मानसशास्त्र विभागाच्या परिसरात श्री दुर्गामंदिर काही वर्षांपूर्वी बांधण्यात आले होते; परंतु ते मंदिर अवैध असल्याचे कारण देत विद्यापीठ प्रशासनाने नुकतेच पाडले. ही कारवाई चालू असतांना विद्यापिठातील काही विद्यार्थ्यांनी त्याला विरोध केला. तेव्हा सुरक्षारक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये वादावादी झाली. राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेस संघटनेने मंदिर तोडण्याचा विरोध केला असून त्यांनी कुलगुरूंच्या दालनाबाहेर निदर्शने केली आणि मंदिर पुन्हा बांधण्याची मागणी केली. (काँग्रेस शासनाच्या काळात अनेक ठिकाणी मंदिरे पाडण्यात आली. एवढेच काय रामसेतूही पाडण्यात आला. त्या वेळी काँग्रेसवाले गप्प राहिले. हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्यास सत्ताच्युत व्हावे लागते, हे त्यांना आता कळू लागले आहे, हेच यातून दिसून येते ! – संपादक) विद्यार्थी काँग्रेस संघटनेचे शहराध्यक्ष अजित सिंह यांनी सांगितले की, प्रशासनातील काही अधिकारी धार्मिक स्थळे हटवून धार्मिक दंगली भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत, तसेच सुरक्षारक्षकांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या अपमानजनक वागणुकीवर प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी केली. उच्च न्यायालयानेच शैक्षणिक परिसरात असलेल्या अवैध धार्मिक स्थळांना काढण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसारच कारवाई केल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात