Menu Close

पुरोगाम्यांनी संतांच्या अभंगांचा त्यांना हवा तसा अर्थ लावू नये ! – सतीश कोचरेकर

मुंबई : सर्व संतांचा पांडुरंग वेगळा करणाऱ्यां पुरोगाम्यांनी संतांच्या अभंगांचा त्यांना हवा तसा अर्थ लावू नये. संतांच्या श्लोकांचा उपदेश देतांना स्वत: त्याचे पालन करतो का ? याचा त्यांनी विचार करावा. ज्यांनी मुळातच देवाचे अस्तित्व नाकारले आहे, ज्यांना वारीचा गाभाच कळलेला नाही, ते वारीत कशासाठी जात आहेत ? डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी काल्पनिक मूर्तीपूजा, तीर्थयात्रा, उपास करणे याला धूर्तांचे मृगजळ म्हटले होते, तर पुरोगामी वारीत घुसतात कशाला ?, असे सडेतोड प्रश्न विचारून हिंदु जनजागृती समितीचे श्री. सतिश कोचरेकर यांनी भक्ती करण्याचा आव आणणाऱ्यां पुरोगाम्यांचे ढोंग उघड केले. साम वाहिनीवर २४ जून या दिवशी वारीमध्ये पुरोगामी का घुसले ? या विषयावर झालेल्या चर्चासत्रात ते बोलत होते. या चर्चासत्रात वारकरी दीपक पाटे, राष्ट्रीय प्रवचनकार श्री. सच्चिदानंद शेवडे, समाजवादी नेते सुभाष वारे, राष्ट्र सेवा दलाचे शरद कदम आणि अंनिसच्या मुक्ता दाभोलकर यांचा सहभाग होता. साम वाहिनीचे संपादक संजय आवटे यांनी चर्चासत्राचे सूत्रसंचालन केले.

श्री. सतिश कोचरेकर यांनी मांडलेली सूत्रे

१. मनामध्ये भक्तीचा लवलेशही नसतांना वारीत जाणारे श्रेष्ठ आहेत, तर वारीत खऱ्यां भक्तीने सहभागी होणारे वारकरी मूर्ख आहेेत का ? पुरोगाम्यांच्या दांभिकतेवर पांघरूण घालून खोटा प्रचार करू नका. वारी ही वारकऱ्यांची, त्यांच्या भक्तीची आहे. पांडुरंगा विषयीची भक्ती हाच वारीचा गाभा आहे. त्यामुळे नास्तिकांना त्यात जागा नाही.

२. पुरोगाम्यांना ज्ञानयोग, भक्तीयोग आणि कर्मयोग यांनुसार देवाची भक्ती करायची नाही. नुसते वारीत जायचे आणि स्वत:ला वारकरी म्हणायचे आहे. इतरांना सांगतांना त्यांनीच मुळात साधना समजून घ्यावी.

३. अद्वैत समजून घेण्यासाठी द्वैताची पायरी चढून जावी लागते. मूर्तीपूजेमुळे देवावरची श्रद्धा वाढून मग अंतर्मनातून देवाशी नाते जोडले जाते. ज्यांना अध्यात्म समजून घेण्याची इच्छा नाही, त्यांनी अद्वैताच्या गोष्टी करणे योग्य आहे का ?

४. कर्मकांड हा हिंदु धर्माचा गाभा आहे. भारतभरातील सर्व मंदिरांमध्ये देवतांची होणारी पूजा कर्मकांडाप्रमाणेच होेते. त्याला नाकारता येत नाही.

राष्ट्रीय प्रवचनकार सच्चिदानंद शेवडे यांनी पुरोगाम्यांचा उघड केलेला खोटारडेपणा !

पुरोगाम्यांचा खोटारडेपणा उघड करतांना राष्ट्रीय प्रवचनकार श्री. सच्चिदानंद शेवडे म्हणाले, अर्थ लावणारे मनी नाही भाव आणि देवा मला पाव म्हणणारे पुरोगामी संतांवर अर्धवट विश्वास ठेवतात, यातच त्यांचा खोटेपणा उघड होतो. स्वत:च्या सोयीनुसार तुकाराम महाराजांना घेऊ नका. तुकाराम महाराजांच्या अभंगांचा अर्थ आणि त्यांनी नास्तिकांवर केलेली टीका अभ्यासा.

सूत्रसंचालक यांचे पुरोगाम्यांना झुकते माप !

संजय आवटे हे मुक्ता दाभोलकर आणि सुभाष वारे यांना त्यांची सूत्रे मांडण्यासाठी पुष्कळ वेळ देत होते, तर हिंदुत्वनिष्ठांचे सूत्र खोडून काढत त्यांना अल्प वेळ देत होते.

१. मुक्ता दाभोलकर पांडुरंगाचे अस्तित्व मान्य करतात का ?, असा प्रश्न  श्री. सतीश कोचरेकर यांनी विचारल्यावर सूत्रसंचालक संजय आवटे यांनी आक्रस्ताळेपणा करत श्री. कोचरेकर यांच्या ध्वनीक्षेपकाचा आवाज बंद करण्यास सांगितले.

२. देवाचे नाव न घेता किंवा देवाची भक्ती न करता संत झालेल्या संतांची नावे श्री. कोचरेकर यांनी विचारल्यावर सूत्रसंचालक यांनी घूमजाव करत विषयालाच बगल दिली. चर्चासत्रात समाजवादी नेते सुभाष वारे यांनी भक्तीयोगातील द्वैत-अद्वैत या संकल्पनेचा स्वत:च्या मनाने हवा तसा अर्थ काढत सतीश कोचरेकर आणि कीर्तनकार सच्चिदानंद शेवडे यांची सूत्रे वरवरची आहेत, असा आरोप पुन:पुन्हा करत होते. (अशा ढोंगी समाजवाद्यांना हिंदू ओळखून आहेत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

हिंदु जनजागृती समितीचे श्री. सतीश कोचरेकर यांनी उघड केला मुक्ता दाभोलकर यांचा दांभिकपणा !

श्री. कोचरेकर म्हणाले, मुक्ता दाभोलकर यांनी मी सांगेन तो देव ! असा हट्टीपणा करतांना ज्या भावाने वारकरी पांडुरंगासाठी वारीत चालतात, त्या पांडुरंगाचे अस्तित्व मान्य करणार का ? ते ही सांगावे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *