प.पू. साध्वी सरस्वती यांच्या वक्तव्याचा गोव्यातील गायिका हेमा सरदेसाई यांनी निषेध केल्याचे प्रकरण !
डिचोली : अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात प.पू.साध्वी सरस्वती यांनी गोहत्येच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा गोव्यातील गायिका हेमा सरदेसाई यांनी निषेध केला होता. या पार्श्वभूमीवर पतंजलि योग समितीचे गोवा प्रमुख श्री. कमलेश बांदेकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. प.पू. साध्वी सरस्वती यांच्या वक्तव्यामुळे गायिका हेमा सरदेसाई यांच्या कोणत्या भावना दुखावल्या ? त्या स्वत: गोमांस खातात का ? त्या गोमांस खात नसतील, तर त्यांना दु:ख होता कामा नये. ख्रिस्त्यांना गोमांस खायला मिळत नाही, म्हणून त्या जर दु:खी झाल्या असतील, तर त्यांच्याच हिंदु धर्मातील पवित्र गायीला क्षुल्लक जिभेचे चोचले पुरवण्यासाठी मारल्याविषयी त्यांना खरेतर खूप दु:ख झाले पाहिजे होते. गोहत्या करणार्यांचा संताप आला पाहिजे होता. हेमा सरदेसाई या स्वधर्मातील परंपरांविषयी संवेदनशील नसून परधर्मातील लोकांना खुश करण्यासाठी त्या आपल्या परंपरांना विरोध करत आहेत. याचे कारण त्यांच्या गाण्याचा चाहतावर्ग हा त्या धर्मातील आहे आणि आपल्या टीआर्पीचा विचार करून केवळ प्रसिद्धी आणि पैसा यांसाठी त्या हिंदु धर्माविरुद्ध भूमिका घेत आहेत. गायिका हेमा सरदेसाई यांचा निषेध करावा तेवढा अल्पच !
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात