गणेशोत्सव मंडळांवर मर्दुमकी दाखवणार्या पोलीस प्रशासनाने अवैध भोंगे लावलेल्या मशिदींवर गुन्हे प्रविष्ट करून न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून दाखवावे !
पुणे : गणेशोत्सवाच्या आधी मंडळांना नोटिसा पाठवणे आणि कार्यकर्त्यांवर गुन्हे प्रविष्ट करणे, हे नित्याचेच झाले आहे. गणेशोत्सव गेली १२५ वर्षे साजरा होत आहे. उत्सव, मंडळे आणि कार्यकर्ते कायद्याच्या विरोधात नाहीत. कायद्याने आवाजाची मर्यादा आखून दिली आहे. आम्हालाही कायद्याच्या चौकटीत राहूनच उत्सव साजरा करायचा आहे.
प्रतिवर्षी ‘डेसिबल’वरून अनेक प्रश्न निर्माण होतात. प्रत्येक वेळी नोटिसा बजावणे आणि गुन्हे प्रविष्ट करणे योग्य नाही. असे करून शासनाला हा उत्सव बंद करायचा आहे का ? (यावरून पोलीस आणि प्रशासन हे गणेशोत्सव मंडळांना किती त्रास देत असतील, हेच दिसून येते. राज्यातील हिंदुत्वनिष्ठ म्हणून निवडून आलेले शासन त्यासाठी काही प्रयत्न करेल का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) नागरिकांना त्रास होत असेल, तर उत्सव बंद करण्याचा विचार करावा लागेल, असे परखड प्रतिपादन श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपति ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी २२ जून या दिवशी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले. (नागरिकांना होणार्या त्रासामागील कारणे लक्षात घेऊन त्यासंदर्भातील अपप्रकार रोखण्यासाठी गोडसे आणि अन्य मंडळांनी प्रयत्न करायला हवेत. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
वर्ष २०१६ च्या गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीत ध्वनीप्रदूषण केल्याचे आढळल्याने पोलिसांनी मानाच्या ५ गणेश मंडळांसह श्री दगडूशेठ हलवाई, अखिल मंडई गणेशोत्सव यांसह ३५ मंडळांना पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर गोडसे यांनी मंडळांची भूमिका मांडली.
ते पुढे म्हणाले की, गणेशोत्सवात शासन आणि यंत्रणा यांनी दायित्व घेऊन काम केल्यास प्रश्न निर्माण होणार नाही. सर्वांनी संवाद साधल्यास तोडगा काढता येऊ शकतो.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात