अमेरिकेतील काश्मिरी हिंदू फाऊंडेेशनची पंतप्रधान मोदी यांच्याकडे मागणी
भारतातील काश्मिरी हिंदूंना त्यांच्यावरील अत्याचारांच्या संदर्भात अमेरिकेत भारताच्या पंतप्रधानांना निवेदन द्यावे लागते, हे लज्जास्पद आहे ! वास्तविक असे निवेदन त्यांना द्यायला लागू नये, अशीच या सरकारकडून अपेक्षा होती; मात्र गेल्या ३ वर्षांत ते झाले नाही, हे हिंदूंचे दुर्दैव ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
वॉशिंग्टन : भारतातील काश्मिरी हिंदूंना आंतरिक स्वरूपातील विस्थापित नागरिक घोषित करण्यात यावे, अशी मागणी करणारे निवेदन अमेरिकेच्या दौर्यावर असलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना येथील काश्मिरी हिंदू फाऊंडेेशन या संस्थेने दिले आहे. तसेच काश्मीर खोर्यातून विस्थापित झालेल्या या हिंदूंच्या संपत्तीचे संरक्षण केले जावे आणि तेथे झालेले अतिक्रमण हटवण्यात यावे, अशा मागण्याही यात करण्यात आल्या आहेत. यासाठी योजना बनवण्यात यावी, असे यात म्हटले आहे.
काही काश्मिरी हिंदूंकडून बळजोरीने कागदांवर स्वाक्षरी घेऊन त्यांची संपत्ती हडपण्यात आली, ती संपत्ती त्यांना परत मिळावी, असेही यात म्हटले आहे.
फ्लोरिडा येथे रहाणारे या फाऊंडेशनचे प्रमुख श्री. दीपक गंजू म्हणाले की, आमची मंदिरे जाळून टाकण्यात आली. तेथे तोडफोड करण्यात आली. आम्ही भारत सरकारला विनंती करतो की, काश्मीर खोर्यातील आमच्या सांस्कृतिक ठिकाणांचे रक्षण करण्यात यावे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात