- धर्मांधांना पोलिसांचे भय राहिले नसल्याने ते पोलीस ठाण्यावर आक्रमण करण्यास धजावतात !
- उत्तरप्रदेशमध्ये अद्यापही धर्मांधांचा उद्दामपणा कायम आहे. यावर योगी आदित्यनाथ यांनी कठोर कारवाई करायला हवी !
- नमाजानंतर धर्मांध संघटित होऊन कायदा हातात घेतात, तर हिंदू मंदिरात गर्दी करूनही कधी धर्मासाठी संघटित होऊन वैध मार्गानेही कृती करत नाहीत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
मेरठ (उत्तरप्रदेश) : येथे धर्मांधांनी सकाळी ईदच्या नमाजानंतर गोळीबार करत येथील परीक्षितगड पोलीस ठाणे जाळण्याचा प्रयत्न केला. यात लहान मुले आणि महिला याही सहभागी झाल्या होत्या. पोलीस ठिकठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात असल्याने येथे पोलिसांची संख्या अल्प होती. पोलिसांनी या वेळी हवेत गोळीबार केला. (धर्मांधांकडे गोळीबार करण्यासाठी शस्त्रे कुठून येतात ? हिंदूंच्या एखाद्या संघटनेने स्वसंरक्षणासाठी त्रिशूळाचे वाटप केले, घरात तलवार ठेवण्याचे आवाहन केले, तर लगेच त्यांच्यावर गुन्हा प्रविष्ट करण्यास सांगणारे धर्मांधांकडील शस्त्रांविषयी कधीच तोंड उघडत नाहीत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) तसेच लाठीमारही केला. यात काही जण घायाळ झाले. धर्मांधांनी केलेल्या दगडफेकीत काही पोलीसही घायाळ झाले. पोलिसांच्या कारवाईनंतर धर्मांधांवर नियंत्रण मिळवण्यात आले.
काही दिवसांपूर्वी अमिताभ या तरुणाची हत्या करण्यात आली होती. त्याच्या कुटुंबियांनी वसीम आणि नदीम यांच्यावर हत्येचा आरोप केला होता. पोलिसांनी या दोघांना पकडून त्यांची चौकशी चालू केली होती. यात वसीमने हत्या केल्याचे स्वीकारले होते. त्यानंतर आणखी ४ जणांना पोलिसांनी कह्यात घेतले होते. यात नागेश शर्मा नावाच्या युवकाचा समावेश होता; मात्र त्याला नंतर सोडण्यात आले. यामुळे येथील मुसलमानांमध्ये राग होता. पोलिसांनी दबावामुळे शर्मा याला सोडल्याच्या रागातूनच धर्मांधांनी सकाळी पोलीस ठाण्यावर आक्रमण केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात