पाकमधील न्यायालयेही हिंदूंच्या विरोधात असून ती न्याय नव्हे, तर अन्यायच करत आहेत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
कराची (पाकिस्तान) : येथे रविता मेघवार या १६ वर्षांच्या हिंदु तरुणीचे अपहरण करून तिला बळजोरीने मुसलमान करण्यात आले आणि नंतर तिचे एका ३५ वर्षीय व्यक्तीशी लग्न लावण्यात आल्याची घटना घडली होती. या प्रकरणी सिंध उच्च न्यायालयाने तिची मुक्तता करण्याऐवजी तिला धर्मांध पतीसह रहाण्यास बाध्य करणारा निर्णय दिला.
न्यायालयाने रवीता यांचे वडील सतरामदास मेघवार यांनी हे धर्मांतर आणि विवाह यांच्या विरुद्ध वकील भगवानदास यांच्यामार्फत सादर केलेल्या अर्जावर वरील निर्णय दिला. भगवानदास वकिलांनी युक्तीवाद केला होता की, १८ वर्षांखालील मुलीचा विवाह हा एक गुन्हा ठरतो. मेघवार यांनी न्यायालयात सांगितले की, ६ जून या दिवशी नागारपारनगरजवळील त्यांच्या गावातून अपहरण झाल्यानंतर त्यांच्या मुलीचा सईद नवाज अली शाह यांच्याशी अवैधरित्या विवाह लावून देण्यात आला होता. त्यानंतर तिचे नाव गुलनाझ असे पालटण्यात आले होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात