मूळचे अमेरिकी आणि धर्माने ज्यू असलेले डॉ. रिचडर्र् बेन्किन हे बांगलादेशमधील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधात सध्या लढत आहेत. ते लेखक, पत्रकार, तसेच प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कार्यकर्ते आहेत. एक ज्यू मानवाधिकार कार्यकर्ते बांगलादेशातील हिंदूंसाठी लढतात; मात्र भारतीय राज्यकर्ते त्यांच्यासाठी काहीही करत नाहीत, हे दुर्दैवी ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
न्यूयॉर्क : मानवाधिकारांची आणि विशेषत: अल्पसंख्यांक हिंदूंच्या अधिकारांची पायमल्ली करणाऱ्या इस्लामी बांगलादेशच्या शासनावर डॉ. रिचडर्र् बेन्किन यांनी आसूड ओढले आहेत. डॉ. बेन्किन यांचा एका संकेतस्थळावरून नुकताच एक लेख प्रसिद्ध झाला. यांत ते म्हणतात, सध्या सत्तेवर असलेली अवामी लीग बांगलादेशी हिंदूंवर होणारे अत्याचार सहन करणार नाही, असे म्हणत आली आहे; परंतु याआधी सत्तेवर असलेल्या बांगलादेश नॅशनलिस्ट (राष्ट्रवादी) पार्टीच्या कार्यकाळापेक्षा आता हिंदूंवरील अत्याचार अधिक वाढले आहेत, तसेच मानवाधिकार कार्यकर्त्यांवरील आक्रमणांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. तरीही त्यांच्यावर आक्रमण करणाऱ्यांच्या विरोधात शासनाने कोणतीही कार्यवाही केलेली नाही.
याचा दाखला देण्यासाठी डॉ. बेन्किन यांनी बांगलादेश मायनॉरिटी वॉचचे अध्यक्ष अधिवक्ता रवींद्र घोष आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर २९ जानेवारीला पोलिसांद्वारे आक्रमण केल्याची घटना नमूद केली. यात चितगांव जिल्ह्यातील हाथाझारी उपजिल्ह्याचे पोलीस उपअधीक्षक महंमद मोशिदौल्ला रेजा यांनी अधिवक्ता घोष आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर आक्रमण केले होते.
डॉ. बेन्किन पुढे म्हणतात, अधिवक्ता रवींद्र घोष यांनी शासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या मानवाधिकारांच्या विरोधातील कृतींना अनेकवेळा अनुभवले आहे. घोष यांच्याकडे याचे पुरावे मोठ्या प्रमाणात आहेत. अशा कृतींमुळे हिंदुहिताचे रक्षण होत नाही. पंतप्रधान शेख हसीना आणि त्यांच्या अवामी लीगच्या शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवे ! (बांगलादेशी हिंदूंवरील अन्याय आणि अत्याचार, तसेच त्यांच्यासाठी लढणाऱ्या मानवाधिकार संघटनांची व्यथा आंतरराष्ट्रीय व्यासपिठावर मांडणारे डॉ. रिचर्ड बेन्किन यांचे अभिनंदन ! असे जरी असले, तरी हिंदूंच्या हितासाठी जागतिक स्तरावर कोणतेही शासन लढणार नाही, हेही आपण स्वीकारायला हवे. त्यामुळे आता देश-विदेशांतील हिंदूंनीच यासाठी कंबर कसायला हवी ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात