Menu Close

खोटा मदरसा दाखवून एमआयएमच्या शहराध्यक्षाने साडेसहा लक्ष रुपये लाटले

मदरसा आधुनिकीकरण योजनेच्या अंतर्गत शासनाची फसवणूक

संभाजीनगर : सरकारकडून डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेच्या अंतर्गत नोंदणीकृत मदरशांना २ लक्ष रुपयांचे अनुदान देण्यात येते. येथील मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (एम्आयएम्) शहराध्यक्ष शेख महंमद नदीम याने बेगमपुऱ्यांतील एका मशिदीमध्ये मदरसा चालू असल्याची खोटी कागदपत्रे दाखवून सरकारकडून ६ लक्ष ४० सहस्र रुपये लाटले. या प्रकरणी सिटीचौक पोलीस ठाण्यात नदीमसह ७ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला. नदीमने सरकार अनुदान लाटण्यासाठी ‘लोकहित शिक्षण संस्थे’ची स्थापना केली होती. (इस्लाममध्ये संगणक शिकण्यासारख्या गोष्टी निषिद्ध मानल्या गेल्या आहे. मग मदरसा आधुनिकीकरण योजनेची आवश्यकताच काय ? यातून मुसलमान धर्मियांच्या धर्मपालनामध्ये बाधा येत नाही का ? एकीकडे सरकारी अनुदान लाटायचे, खोटे मदरसे दाखवायचे आणि राष्ट्रविरोधी कृती करायच्या, हा प्रकार आता बंद झालाच पाहिजे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *