कोलकाता – विश्व हिंदू परिषदेने बांगलादेशात अल्पसंख्यांक समुदायांवर होणारी आक्रमणे रोखण्यासाठी १ जुलै या दिवशी कोलकाता येथे बांगलादेशाच्या दूतावाससमोर निदर्शने आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात विहिंपच्या राज्य शाखेने राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांना राजभवनात एक निवेदन सादर केले. आमचे कार्यकर्ते बांगलादेशाच्या उप उच्चायुक्त कार्यालयावर एक मोर्चा नेणार आहेत. आम्ही हिंदू आणि बौद्ध मंदिरांच्या भक्तगणांना आमच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची विनंती केली आहे; कारण बांगलादेशात त्यांच्या धर्मबंधूंवर बहुसंख्य समाज हिंसक अत्याचार करत आहेत, असे विहिंपचे प्रवक्ते सौरीश मुखर्जी यांनी सांगितले. शहरातील १ जुलैच्या निदर्शनांमध्ये सहभागी होण्यासाठी धार्मिक नेत्यांना आणि भारत सेवाश्रम संघाच्या सदस्यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात