म्हैसुरू (कर्नाटक) : येथील म्हैसुरू कला मंदिर या सरकारी इमारतीमध्ये चार्विका संस्थेकडून खाद्यसंस्कृतीविषयी ३ दिवसीय संमेलन आयोजित करण्यात आले होते. या वेळी येथे गोमांस खाण्यात आल्याचे सांगत भाजपच्या कार्यकर्त्यांनी गोमूत्र शिंपडून ही इमारत शुद्ध केली. या संमेलनाच्या शेवटच्या दिवशी म्हैसुरु विश्वविद्यालयाचे माजी प्राध्यपक आणि साम्यवादी विचारवंत एस्. भगवान उपस्थित होते आणि त्यांनीही या वेळी गोमांस खाल्ले, असे कार्यकर्त्यांनी सांगितले.
चार्विका संस्थेला संमेलनासाठी अनुमती देतांना येथे भोजन करण्याची अनुमती नव्हती. यामुळे म्हैसुरू जिल्हाधिकार्यांनी संस्थेची ५ सहस्र रुपयांची अनामत रक्कम जप्त केली आहे. तसेच जिल्हाधिकार्यांनी संस्थेला नोटीस पाठवली आहे.