चमत्काराने रुग्णांना बरे करण्याचा दावा करणारे फादर सॅबेस्टीन स्वत: मात्र रुग्णालयात दाखल !
वसई : येथील भुईगाव येथील आशीर्वाद केंद्राचे संचालक सॅबेस्टीन मार्टिन येशूला प्रार्थना करून असाध्य आजार बरे करत असल्याचा दावा करत असले, तरी ते चमत्काराच्या नावे फसवणूक करून धर्मांतर करत आहेत, हे आता सिद्ध झाले आहे. नागरिकांमधील वाढता संताप पहाता हे केंद्र बंद करण्याच्या कायदेशीर प्रक्रियेला पोलिसांनी आरंभ करताच यातून पळ काढण्यासाठीच ते इलाजाच्या नावाखाली ठाणे येथील ज्युपिटर रुग्णालयात दाखल झाले आहेत. इतरांना केवळ हात लावून प्रार्थनेने बरे करणारे फादर स्वतः मात्र रुग्णालयात उपचार करून घेत असल्याने त्यांची भोंदूगिरी उघड झाली आहे. पोलिसांनी या त्यांच्या नाटकी डावपेचांना बळी न पडता त्वरित त्यांना अटक करावी, तसेच अशा प्रकारे फसवणूक आणि धर्मांतर करणाऱ्या फादरना कायद्याचा बडगा दाखवावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे मुंबई प्रवक्ता वैद्य उदय धुरी यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे.
या पत्रकात पुढे म्हटले आहे की, वसई पोलीस ठाण्यात जादूटोणाविरोधी कायदा, तसचे मादक पदार्थ आणि आक्षेपार्ह जाहिरात कायद्याच्या अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे; परंतु अशा प्रकारची अनेक केंद्रे आणि प्रार्थनेचे कार्यक्रम महाराष्ट्रात सर्वत्र अजूनही चालू आहेत. यामुळे आता शासनाने अशा ख्रिस्ती फादरांच्या कार्यक्रमांची सखोल चौकशी करून फसवणूक करणारी सर्व केंद्र तात्काळ बंद करावीत, तसेच संबंधित फादरांच्यावर कठोर कायदेशीर करावी, अशी सर्वसामान्य जनतेची मागणी आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात