Menu Close

मलकापूर (जिल्हा सातारा) येथे हिंदुत्वनिष्ठ अजय पावसकर यांच्यावर गोळीबार

  • हिंदुत्वनिष्ठ आणि त्यांचे नेते यांना वेचून ठार करणे हे मोठे षड्यंत्र आहे, हे शासनकर्ते लक्षात घेऊन याची पाळेमुळे खणून काढतील का ?
  • हिंदूंनो, तुमच्याकडे आणि तुमच्या नेत्यांकडे वाकड्या दृष्टीने पहाण्याचे कुणाचे धाडस होणार नाही, असे संघटित बळ निर्माण करा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
श्री. अजय पावसकर

कराड : सातारा जिल्ह्यातील कराड येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. अजय पावसकर यांच्यावर २८ जूनला रात्री १०.३० वाजता ४ अज्ञात आक्रमणकर्त्यांनी गोळीबार केला; मात्र आक्रमणकर्त्यांचा नेम चुकल्याने पावसकर या आक्रमणातून वाचले आहेत. या प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.  २८ जूनला श्री. अजय पावसकर हे कराड तालुक्यातील मलकापूर येथे महामार्गानजीक असलेल्या एका ढाब्यावर जेवणासाठी थांबले होते. तेथे ते भ्रमणभाषवर बोलत ढाब्याच्या बाहेर आले.

त्या वेळी तेथे दबा धरून बसलेल्या आक्रमणकर्त्यांनी महामार्गावरून श्री. पावसकर यांच्या पाठीमागून त्यांच्यावर गोळी झाडली; पण ते भ्रमणभाषवर बोलतांना चालत पुढे गेल्याने मारेकर्यांयंचा नेम चुकला. श्री. पावसकर यांनी प्रसंगावधान राखून मारेकर्यांच्या दिशेने दगड मारला. त्या वेळी मारेकर्यांवनी श्री. पावसकर यांच्या दिशेने अजून दोन-तीन गोळ्या झाडल्या आणि ते दुचाकीवरून पळून गेले. श्री. पावसकर यांनी त्यांचा पाठलागही केला; परंतु मारेकरी पसार झालेे. श्री. अजय पावसकर यांना मारण्यासाठी एकूण ४ मारेकरी आले होते. पोलिसांकडून कारवाईचे आश्वाासन स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख घनवट यांनी घटनास्थळाची पाहणी केली. घटनास्थळी ३ पुंगळ्या सापडल्या असून त्या कलिना प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि कराड पोलिसांची २ पथके गुन्हेगारांचा शोध घेण्यास रवाना झाली आहे.

जिल्हा पोलीसप्रमुख संदीप पाटील यांनी ‘आजूबाजूचे सीसीटीव्हीचे चित्रण मिळते का, ते पहात आहोत, तसेच गुंडांच्या टोळ्यांचीही चौकशी करणार आहोत’, असे सांगितले. तसेच ‘श्री. पावसकर यांनी पोलीस संरक्षण मागितल्यास ते देऊ’, असे सांगितले.

श्री. अजय पावसकर यांचा गोवा येथे झालेल्या ‘सहाव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशना’त सहभाग

श्री. अजय पावसकर यांचे वडील श्री. विनायक पावसकर हे हिंदु एकता आंदोलन या संघटनेचे प्रांताध्यक्ष आणि भाजपचे नगरसेवक आहेत. त्यांचे थोरले बंधू श्री. विक्रम पावसकर हे सातारा जिल्हा भाजपचे अध्यक्ष आणि हिंदु एकता आंदोलनाचे सातारा जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांच्या मातोश्री सौ. विद्या पावसकर या भाजपच्या नगरसेविका आहेत. श्री. अजय पावसकर जून मासात गोवा येथे झालेल्या ‘सहाव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशना’त सहभागी झाले होते. त्यांचे संपूर्ण कुटुंब हिंदूंच्या साहाय्यासाठी नेहमी कार्यरत असते. लव्ह जिहाद, गोहत्या रोखणे यांसाठी सर्व कुटुंबिय कार्यरत आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *