जगभरात असंख्य ख्रिस्ती धर्मगुरूंवर लैंगिक शोषणाचे आरोप झाले, अनेकांना दोषी ठरवण्यात आले, पीडितांना कोट्यवधी रुपयांची हानीभरपाई देण्यात आली; मात्र या संदर्भात भारतातील प्रसारमाध्यमांनी वृत्ते प्रसिद्ध केली नाहीत; कारण बहुतेक प्रसारमाध्यमे विदेशी ख्रिस्ती आणि निधर्मीवादी (हिंदुद्वेषी) यांच्या हातात आहेत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
सिडनी : ऑस्ट्रेलियातील सर्वोच्च ख्रिस्ती धर्मगुरु आणि व्हॅटीकनमधील पोप यांचे ७६ वर्षीय मुख्य आर्थिक सल्लागार कार्डीनल जॉर्ज पेल यांच्यावर काही वर्षांपूर्वी अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली ऑस्ट्रेलियातील पोलिसांनी गुन्हा प्रविष्ट केला आहे. पेल यांना १८ जुलै या दिवशी मेलबर्न येथील न्यायालयात उपस्थित रहाण्याचे समन्स बजावण्यात आले आहे. या घटनेमुळे व्हॅटीकन आणि जगातील सर्वच ख्रिस्ती जगतात खळबळ माजली आहे.
१. पेल यांनी ऑस्ट्रेलियात काही वर्षांपूर्वी चर्चच्या विविध धर्मगुरूंनी अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याच्या घटना दाबून टाकल्या आणि या अत्याचारात बळी पडलेल्या मुलांच्या जबाबाऐवजी आरोप असलेल्या धर्मगुरूंच्या सांगण्यालाच प्राधान्य दिल्याचे आरोप आहेत. एवढेच नव्हे, तर स्वत: जॉर्ज पेल यांच्यावरही २ व्यक्तींशी अशाच प्रकारचे अनुचित वर्तन केल्याचे आरोप केले गेले आहेत.
२. शासनाने या प्रकरणी एक चौकशी आयोग नेमला होता. या आयोगाच्या अहवालानंतर पोलिसांनी या दिशेने गुप्त चौकशी चालू केली होती. तेव्हा या अत्याचारांचा बळी ठरलेल्या मुलांनी आणि त्यातील काही आता प्रौढ झाले आहेत अशांनी आयोगाला आणि पोलिसांना भय न बाळगता सविस्तर माहिती दिली.
३. चर्चच्या लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या अनेक मुलांनी आत्महत्येचा मार्ग पत्करल्याचे पोलिसांना आढळून आले; मात्र कार्डीनल जॉर्ज पेल याने त्याची काहीच भीती बाळगली नाही. उलट बाहेरील देशात कार्यरत असणार्या काही धर्मगुरूंवर अशाच प्रकारचे आरोप असतांना त्यांना ऑस्ट्रेलियात मानाच्या जागा देण्यात आल्याचे कळते.
४. या सर्व प्रकाराने पोप अत्यंत व्यथित झाल्याचे कळते. काही दिवसांपूर्वीच चर्चच्या लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या मुलांची त्यांनी जाहीर क्षमायाचना केली होती आणि चर्चमध्ये असे प्रकार कदापिही होणार नाहीत, असे अभिवचन दिले होते. अनेक प्रकरणी कोट्यवधी रुपये हानी भरपाईपोटी देऊन न्यायालयाबाहेर तडजोड करण्यात आली होती.
५. कार्डीनल जॉर्ज पेल सध्या व्हॅटीकनमध्ये असून ऑस्ट्रेलिया आणि व्हॅटीकन या देशांत प्रत्यार्पण करार नसल्याने पेल यांना ऑस्ट्रेलियातील न्यायालयासमोर उपस्थित रहाण्याचा आदेश पोप देतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. (इंग्रजीत ‘कार्डीनल सीन’ म्हणजे ‘अक्षम्य पाप’ असा वाक्प्रचार आहे. कार्डीनल जॉर्ज पेल यांच्या कृत्यांनाही ‘कार्डीनल सीन’ म्हणणे वावगे ठरू नये. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात