Menu Close

उत्तरप्रदेशातील सगामई गावातील मंदिरात तोडफोड

  • समाजवादी पक्षाच्या राजवटीत हिंदूंची मंदिरे असुरक्षित !

  • प्राचीन शिवलिंग आणि दानपेटी यांची चोरी

Mandir_aaghat_C

अजीतगंज (मैनपुरी, उत्तरप्रदेश) : खासदार तेजप्रताप यांनी दत्तक घेतलेल्या सगामई या गावात एका मंदिरातील शिव, सरस्वती देवी, श्री गणेश या देवतांच्या मूर्तींची तोडफोड करण्यात आली, तसेच प्राचीन शिवलिंग, ध्वनीक्षेपक यंत्रणा आणि दानपेटी यांची चोरी करण्यात आली. गावातील काही प्रतिष्ठित ग्रामस्थ आणि पोलीस यांच्या सतर्कतेमुळे तेथील वातावरण शांत ठेवण्यात यश मिळाले.

४ फेबु्रवारी या दिवशी सकाळी काही ग्रामस्थ पूजाअर्चेसाठी मंदिरात गेले असता ही घटना उघडकीस आली. त्यानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली आणि तणाव निर्माण झाला; मात्र गावातील काही जागरूक नागरिकांमुळे ग्रामस्थ शांत झाले. या वेळी ग्रामस्थांनी शिवलिंग कह्यात घेण्याची आणि मूर्तींची परत स्थापना करण्याची मागणी केली. प्रशासनाकडून तोडफोड करणाऱ्यांचा तपास करण्यात येत आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *