बैठकीवर बहिष्कार घालण्याची वेळ का येते, याचा पोलीस प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
पुणे : गणेशोत्सव निर्विघ्नपणे होण्यासाठी प्रतिवर्षी शहरातील गणेश मंडळांकडून पोलिसांना सहकार्य केले जाते; मात्र मंडळांना चुकीच्या पद्धतीने नोटिसा पाठवण्यात येत असल्याने शहरातील मानाच्या मंडळांनी पोलिसांकडून उत्सवाची पूर्वसिद्धता आणि नियोजन यांसाठी आयोजित केलेल्या बैठकांवर बहिष्कार घातला आहे. महापौर मुक्ता टिळक यांच्यासह २८ जूनला झालेल्या बैठकीमध्ये मानाच्या मंडळांच्या सहमतीने हा निर्णय घेतला. या वेळी मानाचा श्री कसबा गणपति, श्री तांबडी जोगेश्वररी, गुरुजी तालीम मंडळ, तुळशीबाग गणेशोत्सव, केसरीवाडा, अखिल मंडई मंडळ आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांचे प्रमुख पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते. मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले, पोलिसांच्या नोटिशीला मंडळांकडून कायदेशीर उत्तर दिले जाईल. सहकार्य करणाऱ्यां, मंडळांना नाहक त्रास देण्यात येत आहे. मिरवणुकीमध्ये ध्वनीपातळी मोजण्याचे निकष किती अंतरावर ठरवले जातात, याची नियमावली निश्चि्त करण्याची मागणी केली जात आहे.
खटले मागे घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार ! – भाजप खासदार अनिल शिरोळे
मीही गणेशोत्सव मंडळाचाच एक कार्यकर्ता असून गणेशोत्सवात काम करूनच राजकारणात आलो आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना होणारा त्रास मी जाणतो. गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना होणाऱ्यां त्रासाविषयी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हा प्रश्ने लवकरात लवकर निकाली काढला जाईल, असे आश्वासन खासदार अनिल शिरोळे यांनी दिले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपति ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळ यांच्या वतीने राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ गणेश कला क्रीडा मंच येथे २७ जूनला पार पडला. त्या वेळी ते बोलत होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात