चीनकडून भारताचा आणखी एक बंकर उद्ध्वस्त लडाख, अरुणाचल प्रदेश आणि आता सिक्कीमही आमचा म्हणणार्यात चीनला भारतीय शासनकर्ते जशास तसे धडा शिकवण्याची शक्यता अल्पच आहे.चीनसारख्या शत्रूला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतियांनीही सिद्ध रहायला हवे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
बीजिंग : चीनकडून सिक्कीममध्ये भारतीय सीमेमध्ये अवैधपणे बांधकाम करून मार्ग बनवण्यात येत आहे. त्या मार्गात येणारे भारतीय सैन्याचे २ बंकर काही दिवसांपूर्वी चीनने उद्ध्वस्त केले होते. आता आणखी एक बंकर बुलडोझरच्या साहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आला आहे. १८९० मध्ये झालेल्या सिनो-ब्रिटीश करारानुसार हा परिसर आमचा असून त्यात शंका घेण्याचे काहीच कारण नाही, असे चीनने म्हटले आहे.
१. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लू कांग यांनी म्हटले की, सिनो-ब्रिटिश करारानुसार सिक्कीमचे प्राचीन नाव झी होते. डोंगलांग भूतान किंवा भारत यांचा भाग नाही. तो पूर्वापार चीनचाच भाग राहिला आहे. याचे कायदेशीर पुरावे आमच्याकडे आहेत. येथे बनवण्यात येणारा मार्ग वैध आहे. यात कोणत्याही देशाला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. या विषयावर भारताला चर्चा करायची असेल, तर प्रथम येथील सैन्य हटवावे, असेही कांग म्हणाले.
२. दुसरीकडे चीन कथितरित्या सीमावादापासून दूर आहे आणि भारतालाच आता या सूत्रावर धडा शिकवण्याची आवश्यकता आहे, अशी गरळओक चीनच्या सरकारी माध्यमांनी अग्रलेख आणि बातम्यांमधून केली आहे.
३. चीनकडून सिक्कीम सेक्टरच्या डोंगलांग परिसरात रस्ता विकसित केला जात आहे. ज्या परिसरात चीन रस्ता विकसित करत आहे. त्याचा काही भाग भूतानमध्ये आहे. या सूत्रावर चीन आणि भूतान यांच्यातही वाद चालू आहे. त्यांच्यामध्ये या सूत्रावर २४ वेळा चर्चा झाली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात