‘भारतीय जवानोंका अपमान, नही सहेगा हिंदुस्थान’ च्या घोषणा देत राष्ट्रप्रेमी नागरिक आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी !
मुंबई : उत्तर प्रदेश येथील समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी मंत्री आझम खान यांनी भारतीय सैनिकांना बलात्कारी ठरवण्याविषयी केलेले वक्तव्य देशविघातक शक्तींना प्रोत्साहन देणारे आहे. यामागे देशद्रोही प्रवृत्तीला खतपाणी घालून भारताला अस्थिर करण्याचे अत्यंस्थ षड्यंत्र असल्याचे दिसून येते. याविषयी शासनाने आझम खान यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा प्रविष्ट करून त्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने करण्यात आली. आझम खान यांच्यावर कारवाई व्हावी, या मागणीसाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने ३० जून या दिवशी कबुतरखान्याच्या ठिकाणी आंदोलन करण्यात आले. १ लक्ष ६४ सहस्र २४३ फेसबूक दर्शकांनी आंदोलनाचा लाभ घेतला. आंदोलनात श्री शिवकार्य प्रतिष्ठान, स्वराज्य युवा प्रतिष्ठान, रायगड संवर्धन प्रतिष्ठान, हिंदू एकता जागृत समिती, बजरंग दल, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदू राष्ट्र सेना, विश्व हिंदु परिषद, वज्रदल, हिंदू गोवंश रक्षा समिती, हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था आदी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. आंदोलनाचे सूत्रसंचालन श्री. योगेश शिर्के यांनी केले. आंदोलकांनी घोषणांद्वारे आझम खान यांचा धिक्कार केला.
मान्यवरांची भाषणे
देशद्रोही वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई न होणे शासनासाठी लज्जास्पद ! – प्रकाश सावंत, हिंदू राष्ट्र सेना
भारतीय सैनिक सीमेवर राहून देशवासियांचे रक्षण करतात. त्यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य राष्ट्रप्रेमी नागरिक सहन करणार नाहीत. केंद्रात हिंदुत्वनिष्ठ शासन आहे. देशद्रोही वक्तव्य करणाऱ्यां आझम खान यांच्यावर देशद्रोह्यांवर शासनाने कठोर कारवाई करावी, अशी राष्ट्रप्रेमी नागरिकांची अपेक्षा आहे. देशद्रोही वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई न होणे शासनासाठी लज्जास्पद आहे.
राष्ट्रप्रेमी नागरिकांचा उद्रेक झाल्यास शासन उत्तरदायी ठरेल ! – श्री. प्रभाकर भोसले, श्री शिवकार्य प्रतिष्ठान
आज जिथे सैनिक सुरक्षित नाहीत, तिथे सर्वसामान्यांची काय स्थिती होईल ? आज कुणीही उठतो आणि देव, देश अन् भारतीय सैनिक यांविषयी अवमानकारक वक्तव्य करतो. राष्ट्रप्रेमी नागरिक असे वक्तव्य सहन करणार नाहीत. पाकिस्तानचा उदो उदो करणाऱ्यांना शासनाने भर चौकात फाशी द्यायला हवी, तरच देशद्रोही प्रवृत्तीला आळा बसेल. आझम खान यांच्यावर शासनाने कारवाई केली नाही, तर होणाऱ्यां उद्रेकाला शासन उत्तरदायी ठरेल.
देशद्रोहाचे कलम लावून आझम खान याला तुरुंगात पाठवा. – डॉ. उदय धुरी, हिंदु जनजागृती समिती
सैनिकांचा सन्मान न करणाऱ्यांची देशाला आवश्यकता नाही. – हर्षद खानविलकर, हिंदु जनजागृती समिती
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात