मंगळुरू : कर्नाटकमधील उडपी येथे प्राचीन कृष्ण मठ परिसरात इफ्तारचे आयोजन करण्यात आले होते. श्रीराम सेनेने याला राज्यभरात विरोध केला आहे. केवळ भजन, किर्तनाच्या मार्गाने विरोध न करता सेनेने जिथे इफ्तार आणि नमाज अदा झाली ती जागा गोमुत्राने ‘शुद्ध’ करण्याचा निर्णय घेतला आहे.
रमजानच्या महिन्यात २४ जूनला मंदिर परिसरात ‘सौहार्द कूट’ नावाच्या कार्यक्रमांतर्गत ही इफ्तारची दावत झाली होती. पर्याय पेजावर मठाचे प्रमुख विश्वेष तीर्थ स्वामीजी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्याला श्रीराम सेनेने विरोध केला. श्रीराम सेनेचा जिल्हा विभाग आणि हिंदु जनजागृती समिती याविरोधात रविवारी उडपीच्या क्लॉक टॉवरवर प्रार्थना आणि भजनाचा कार्यक्रम ठेवला आहे. मंदिराच्या ज्या सभागृहात इफ्तार आणि नमाज अदा झाली त्या जागेचे गोमुत्राने ‘शुद्धीकरण’ करण्याचा निर्णयही सेनेने घेतला आहे. गायींची कत्तल करणारे आणि गोमांस खाणाऱ्यांनी अन्नब्रह्म भोजनगृहात नमाज अदा करण्यामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या असल्याचे श्रीराम सेनेचे म्हणणे आहे.
यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना श्रीराम सेनेच्या मंगळुरू विभागाचे सचिव मोहन भट्ट म्हणाले, ‘सेनेचा इफ्तारला विरोध नाही, पण तिथे नमाज अदा करायला नको होता. त्यामुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत, म्हणून आम्ही प्रार्थनेचे आयोजन केले आहे.’
हिंदु जनजागृती समितीचे निमंत्रक विजय कुमार म्हणाले, ‘पेजावरच्या स्वामींनी हिंदुंजी माफी मागायला हवी. अन्यथा आम्ही शांततेच्या मार्गाने विरोध करू.’
संदर्भ : महाराष्ट्र टाइम्स
१ जुलै २०१७
श्रीराम सेना २ जुलैपासून कर्नाटकात आंदोलन करणार
उडुपीच्या श्रीकृष्ण मठातील इफ्तार मेजवानीचे प्रकरण
मंगळुरू (कर्नाटक) : पेजावर श्री विश्वेशतीर्थ स्वामी यांनी मठामध्ये इफ्तारच्या मेजवानीचे आयोजन करून सर्व हिंदूंचा अवमान केला आहे. स्वामीजी हिंदूंचे मार्गदर्शक असतांना त्यांनी अशी कृती करून मोठी चूक केली आहे. या विरोधात श्रीराम सेना २ जुलैपासून कर्नाटक राज्यात आंदोलन करणार आहे, अशी माहिती श्रीराम सेनेचे नेते श्री. प्रवीण वाळके यांनी येथे एका पत्रकार परिषदेत दिली. या वेळी हिंदु महासभेचे श्री. धर्मेंद्र, हिंदु जनजागृती समितीचे दक्षिण कन्नड जिल्हा समन्वयक श्री. चंद्र मोगेर आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.
समितीचे श्री. चंद्र मोगेर म्हणाले की, काश्मीरमध्ये हिंदूंवर होणार्या अत्याचारांवर, त्यांना पळवून लावण्यावर कोणत्याही मुसलमानाने सौहार्दाची भाषा केली नाही. गोहत्याबंदीचे कोणताही मुसलमान स्वागत करत नाही. जर सौहार्द हवे, तर लव्ह जिहादचा विरोध का केला जात नाही? मंगळुरूच्या कलकड्डमध्ये दंगल झाल्यावर मुसलमानांनी सौहार्द का नाही राखला ? मूर्तीपूजेचा विरोध करणार्यांना मठामध्ये नमाजपठन आणि इफ्तार करण्यास देऊन स्वामीजींनी चूकच केली आहे. ते यातून कोणता संदेश देऊ इच्छितात ? गांधी यांनीही मुसलमानां बंधूभाव ठेवण्याचा प्रयत्न केला त्याचे परिणाम हिंदूंच्या हत्येत झाले. हिंदूंना सौहार्दासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही. अन्य धर्मियांनीच तो प्रयत्न करावा. या घटनेमुळे स्वामीजींना धर्मशिक्षणाची आवश्यकता आहे, हे लक्षात येते.
तुम्ही सर्व मुसलमानांना लक्ष्य का करता ? मुसलमानांमध्येही चांगल्या व्यक्ती आहेत ना ? या एका पत्रकाराच्या प्रश्नांवर श्री. मोगेरे म्हणाले की, जे चांगले आहेत, देशभक्त आहेत त्यांनी स्वतःहून समोर आले पाहिजे. आम्ही त्यांना शोधायला जाणार नाही.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात