श्री स्वामी चैतन्य परिवाराच्या वतीने पत्रकार परिषद
चिपळूण : शनीची स्पंदने स्त्री प्रकृतीला घातक ठरू शकतात. धर्मशास्त्रात विचारपूर्वक आणि सुरक्षेसाठीच हे नियम केले आहेत. हल्ली अनेक शास्त्रज्ञांनी काही स्पंदने प्रकृतीला घातक ठरत असल्याबद्दलचे मत मांडले आहे. शनिशिंगणापूर आंदोलनामागे आध्यात्मिक दृष्टीकोन नव्हता. तेथील प्रथा-परंपरा ही स्त्रियांवरील अन्यायाची गोष्ट नाही. जेथे स्त्रियांवर अन्याय होतो, तेथे लढा द्यायला हवा. चित्रपटांमध्ये स्त्रीदेहाचे आेंगळवाणे प्रदर्शन होते, ही स्त्रीची खरी विटंबना आहे. शनीच्या चौथऱ्यावर चढण्यासाठी आटापिटा करण्यापेक्षा ही विटंबना करणाऱ्यांच्या उरावर चढून ती पिडा दूर करण्याचा प्रयत्न करा, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी येथील पत्रकार परिषदेत केले.
चारुदत्त आफळे यांच्या कीर्तनमालेचे आयोजन करणाऱ्या श्री स्वामी चैतन्य परिवाराच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत शनीशिंगणापूर येथील शनीच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेशाविषयी आपले मत काय ? या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना आफळेबुवा बोलत होते.
चारुदत्त आफळे पुढे म्हणाले,
धार्मिक क्षेत्रांसंबंधी पूर्वीच्या काळी केलेले नियम हे केवळ सुरक्षेसाठी आहेत !
स्त्रियांच्या देहप्रदर्शनातून बलात्काराच्या घटना प्रतिदिन वाढत आहेत. हे स्त्रियांविषयी खरे संकट आहे, या विषयाला बगल देऊन नको त्या विषयाला उधाण आणू नये. धर्मशास्त्राचा अभ्यास करून आपण आपली आध्यात्मिक प्रगती करून घ्यायची असते. पुरुष आणि स्त्री निर्सगता भेद आहे. शासनाच्या कित्येक गोष्टी प्रतिबंधात्मक असतात, तेथे आपण असमानता समजतो का ? धार्मिक क्षेत्रांसंबंधी पूर्वीच्या काळी केलेले नियम हे सुरेक्षेसाठी केले आहेत.
इस्रायलप्रमाणे प्रत्येक नागरिकाला सैनिकी प्रशिक्षण
इस्रायलप्रमाणे प्रत्येक नागरिकाला सैनिकी प्रशिक्षण दिले गेले, तर कोणत्याही प्रकारच्या आतंकवादाला तोंड देण्यासाठी येथील जनता सक्षम होईल.
मदरशांमध्ये विद्वेष नको !
मदरशांमध्ये तसेच इतर कोणत्याही धार्मिक स्थळांमध्ये अन्य धर्मांविषयी विद्वेष पसरवण्यात येत असेल, तर ते निषेधार्ह आहे.