गायींची हत्या करणा-या कसायांना धडा शिकवण्यासाठी शस्त्रे हाती घेऊ, असे मुस्लिम महिलांना का वाटत नाही ? – संपादक, हिंदुजागृती
मनुवा (रामगढ-झारखंड) : स्वयंघोषित गोरक्षकांकडून गुरुवारी मुस्लीम व्यापाऱ्याची मारहाणीत हत्या केल्यानंतर येथील मुस्लीम महिलांनी गोरक्षकांना हाती शस्त्रे घेऊन धडा शिकवण्याची धमकी दिली आहे.
मुस्लीम व्यापारी अलिमुद्दीन उर्फ असगर अली यांचा जवळपास १०० जणांच्या जमावाने केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला. अलिमुद्दीन गायीच्या मांसाची वाहतूक करीत असल्याचा या जमावाचा संशय होता. जमावाने त्यांची कारही पेटवून दिली. पोलिसांच्या वर्तनाने संतापलेल्या महिलांचा आता पोलिसांवरही विश्वास राहिलेला नाही. सरकारच या गोरक्षकांच्या कृत्यांत सहभागी असल्याचा आरोप या महिलांनी केला आहे. जमावाच्या कृत्याला जमावाद्वारेच उत्तर दिले जाईल, असे अलिमुद्दीन यांची पत्नी मरीयम खातून म्हणाल्या. गोरक्षकांना उत्तर देण्याबद्दल अनेक महिला मरीयम यांच्याशी सहमत आहेत. तर ममिना खातून म्हणाल्या की, आम्ही बायका आमचे पती घरी परत येतील की नाही या विचारांनी सतत भयभीत असतो. सरकार जर काही कृती करणार नसेल तर आम्ही आमच्या माणसांच्या संरक्षणासाठी हाती शस्त्रे घेऊ.
आमच्या खाण्यापिण्याच्या सवयी काय आहेत, यात ठरावीक समाजाला काय गोडी आहे ? आम्ही त्यांच्या स्वयंपाकघरात डोकावतो का ? असे अबिदा खातून म्हणाल्या. आम्ही शांततेने जगणारे लोक आहोत. एखादी घटना आम्हाला शस्त्र हाती घेण्यास चिथावणी देणार नाही, असे भोला खान म्हणाले. प्रशासन आणि ग्रामस्थांमध्ये खान यांनी मध्यस्थ म्हणून काम केले.
संदर्भ : लोकमत