Menu Close

नगर : बेकायदा कत्तलखान्यावर छापा, १५० किलो गोमांस जप्त

नगर : शहरातील झेंडीगेट भागातील बेकायदा सुरू असलेल्या कत्तखान्यावर पोलिसांना छापा टाकून १५० किलो गोमांस जप्त केले. तसेच लहान व मोठ्या गायींचा सुटका केली. कोतवाली पोलिसांनी गुरुवारी रात्री ही कारवाई केली.

मुंबई येथील उमर फिरोज कुरेशी, फैजल शौकत कुरेशी, मुस्तफा शरीफ कुरेशी या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. पोलिस आल्यानंतर काही आरोपी फरारी झाले आहेत. त्यांचा शोध पोलिस घेत आहेत. झेंडीगेट भागात एका घरातून गायीच्या मांसाची विक्री केली जात असल्याची माहिती कोतवाली पोलिस स्टेशनला मिळाली होती. त्यानुसार पोलिस पथकाने गुरुवारी रात्री त्या ठिकाणी छापा टाकून गोमांस जप्त करून लहान व मोठ्या जनावरांची सुटका केली. मुंबई येथे हे गोमांस विक्रीसाठी नेले जात असल्याचा पोलिसांचा संशय असून, त्या दृष्टीने पोलिस तपास करीत आहेत.

संदर्भ : मटा

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *