मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम !
सोलापूर : अन्न आणि औषध प्रशासनाकडून आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर नुकतीच पंढरपूर शहरातील उपाहारगृहे अन् दुकाने यांची पडताळणी करण्यात आली. या पडताळणीमध्ये विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या प्रसाद भांडारात अस्वच्छता आढळून आली. तसेच प्रसाद म्हणून देण्यात येणार्या लाडूची गुणवत्ता योग्य नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे प्रसाद भांडारास नोटीस देण्यात आली. (महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात अशी स्थिती असेल, तर सरकारीकरण झालेल्या अन्य मंदिरांची कशी स्थिती असेल, याचा विचारच न केलेला बरा ! मंदिराची दु:स्थिती दूर करण्यासाठी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला पर्याय नाही ! – संपादक,दैनिक सनातन प्रभात)
पालखी मार्गावरील १८० उपाहारगृहे आणि दुकाने यांची पडताळणी करण्यात आली. त्यात संबंधितांना सुधारणा करण्यासाठी नोटीस देण्यात आली. विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या प्रसाद बनवण्याच्या ठिकाणी तात्काळ सुधारणा करून अहवाल देण्यास सांगितला आहे. याविषयी साहाय्यक आयुक्त संजय नारागुडे यांनी माहिती दिली. पडताळणी मोहिमेच्या वेळी थेट कारवाई करून खटला प्रविष्ट करण्यात येणार आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात