भारत किमान हिंदू आणि शासकीय शाळांत तरी धर्माशिक्षण देणे प्रारंभ करेल का ? आजही कोट्यवधी हिंदू विद्यार्थी आपल्या शिक्षणाचा आरंभ ग गणपतीचा ऐवजी ग गाढवाचा असा करतात ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
अॅम्स्टरडॅम : हॉलंडच्या हिंदु शाळांमध्ये आता ५ व्या श्रेणीपासून जागतिक शिक्षण अनिवार्य बनवण्याच्या उद्देशाने श्रीमदभगवदगीता आणि उपनिषदे यांसारख्या हिंदूंच्या धर्मग्रंथांमधील शिकवण समाविष्ट करण्यात आली आहे.
हॉलंडमधील हिंदु विद्यार्थी प्रामुख्याने सुरिनाममधून आले आहेत. सुरिनाम येथील हिंदु तरुण सामान्यतः चांगले शिक्षण घेत आहेत आणि तुर्क आणि मोरोक्को येथील मुसलमानांपेक्षा अधिक चांगल्या पगाराच्या नोकर्या करत आहेत. हॉलंडमधील हिंदू केवळ इतर अल्पसंख्यांक गटांपेक्षा वेगाने प्रगती करत असल्याचेच दिसून येत नाहीत, तर ते असे मानतात की, एखाद्याला देशानुसार परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागते, तर ज्या देशात वास्तव्य करायचे असते, त्या देशाच्या सामाजिक आणि राजकीय जीवनात सहभागी होऊन आणि देशाच्या कायद्यांचे पालन करणे उचित असते. (भारतातील अल्पसंख्यांकांनी यापासून काही धडा घेतल्यास देशातील जिहादी आतंकवाद आणि हिंसाचार कधीच नष्ट होईल आणि त्यांचे जीवनमानही सुधारेल. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात