मंगळुरू (कर्नाटक) येथे श्रीराम सेनेकडून आंदोलनअशा प्रकारे मुसलमानांना मठामध्ये आमंत्रित करणे म्हणजे आतंकवादाचा धोका निर्माण करण्यासारखे आहे. मठामध्ये येणाऱ्यांनी मठाची माहिती काढून तेथे घातपात केल्यास त्याचे दायित्व स्वामी स्वीकारतील का ? मठामध्ये इफ्तारची मेजवानी आयोजित करणारे पेजावर स्वामी हिंदूंना काय मार्गदर्शन करणार ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
मंगळुरू (कर्नाटक) : येथील लालबाग विभागामध्ये श्रीराम सेनेकडून उडुपीच्या श्रीकृष्ण मठामध्ये करण्यात आलेल्या इफ्तारच्या मेजवानीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. श्रीराम सेनेकडून २ जुलैपासून राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे. येथील आंदोलनामध्ये हिंदु जनजागृती समिती, हिंदु महासभा आदी संघटनांनी सहभाग घेतला. या वेळी श्रीराम सेनेचे जिल्हाप्रमुख श्री. प्रसाद उजिरे, हिंदु जनजागृती समितीचे दक्षिण कन्नड समन्वयक श्री. चंद्र मोगेर, हिंदु महासभेचे राज्य प्रवक्ता श्री. धर्मेन्द्र आणि अन्य धर्माभिमानी उपस्थित होते. ‘मठामध्ये इफ्तारची मेजवानी केल्यामुळे मठ अपवित्र झाला आहे. त्यामुळे पेजावर स्वामी यांनी सार्वजनिक स्तरावर क्षमा मागावी आणि मठाचे गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण करावे’, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात