Menu Close

संगमनेर (जिल्हा नगर) येथे हिंदु महिलेवर बलात्कार करणाऱ्यां धर्मांधाला पोलीस कोठडी

‘लव्ह जिहाद’चे वाढते आक्रमण रोखण्यासाठी आता महिलांनी रणरागिणी व्हायला हवे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

संगमनेर : येथील ३० वर्षीय महिलेवर इस्माईल पठाण या धर्मांधाने लग्नासह विविध आमिषे दाखवत ६ मास बलात्कार केला. या प्रकरणी पठाणच्या विरोधात महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केल्यावर त्याला अटक करण्यात आली. न्यायालयात उपस्थित केल्यावर त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

१. ओळख झाल्यानंतर पठाणने महिलेला भाड्याच्या घरात रहायला नेले. ‘तुझ्या मुलांना सांभाळतो आणि नवीन घर बांधून देतो’, असे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. (यावरून हिंदु महिलांना धर्मशिक्षणाची केवढी नितांत आवश्यकता आहे, हे लक्षात येते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) 

२. पठाणने तिला तिचे आई-वडील आणि मुले यांना भेटू दिले नाही. तो फसवत असल्याने तिने याविषयी विचारणा केल्यावर त्याने तिला कोंडून ठेवले. तिने आत्महत्येचा प्रयत्न केला.

३. कालांतराने ती आई-वडिलांच्या घरी रहात होती. तेव्हा पठाणने तिच्या आई-वडिलांनाही जीवे मारण्याची धमकी दिली, असे तक्रारीमध्ये म्हटले आहे. (छत्रपती शिवाजी महाराजांनी रांझाच्या पाटलाला ज्याप्रमाणे शासन केले, तसेच शासन अशा धर्मांधांना झाल्यास कायमचा वचक बसेल ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *