कर्नाटकातील काँग्रेस सरकार हिंदूंच्या प्राचीन वास्तूंचे रक्षण करत नाही. त्यामुळे धर्मांधांना त्यावर आक्रमण करता येते ! या घटनेवरून देशात कोणीही बोलत नाही; मात्र एखादे चर्च किंवा मशीद यांवर दगड भिरकावल्याची अफवा जरी उठली, तर देशात हिंसाचार होतो आणि असहिष्णुता वाढल्याचे ऊर बडवले जातात ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
बेल्लारी (कर्नाटक) : २८ जून या दिवशी काही अज्ञातांनी हम्पी येथील जागतिक दर्जा लाभलेल्या ऐतिहासिक ठिकाणी असलेल्या एका शिवलिंगाचा विध्वंस केला. बेल्लारी पोलीस अधीक्षक चेतन आर्.एस्. यांच्या माहितीनुसार तुंगभद्रा नदीच्या पात्रातील दगडांमध्ये असलेल्या शिवलिंगांपैकी एका शिवलिंगाची तोडफोड करण्यात आली. (भारतातील पुरातत्व खाते झोपा काढत असल्यामुळे असे प्रकार घडत आहे. असे पुरातत्व खाते विसर्जित करा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
आम्ही संशयितांना शोधत आहोत. सदर घटना स्मारक संस्कृती संरक्षण सेनेच्या कार्यकर्त्यांनी लक्षात आणून दिली. (याचा अर्थ संघटनेने हे निदर्शनास आणून दिले नसते, तर हे पोलीस, प्रशासन आणि पुरातत्व विभाग यांना कळलेच नसते. याचा अर्थ जागतिक वारसा असलेल्या हिंदूंच्या ठिकाणांची भारतात कशा प्रकारे हेळसांड होते, हेच यातून दिसून येते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) या प्रकरणाचे अन्वेषण हम्पी पोलिसांकडे देण्यात आले, असे पोलीस अधीक्षक चेतन यांनी सांगितले. स्मारक संस्कृती संरक्षण सेनेच्या कार्यकर्त्यांनी राज्य पुरातत्व खात्याचे उपसंचालक, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण संस्थेला आणि बेल्लारी पोलीस अधीक्षक यांना एक निवेदन सादर केले आहे आणि त्यात स्मारकाच्या संरक्षणासाठी आणि विध्वंसक कृत्य करणार्यां ना त्वरित अटक करण्यासाठी पावले उचलण्याची विनंती केली आहे. जर १० दिवसांत कोणतीही कारवाई झाली नाही, तर रस्ता बंद आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणीही सेनेनी दिली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात