Menu Close

प्रखर हिंदुत्वनिष्ठ अजय पावसकर यांच्यावर आक्रमण करणार्‍यांना ८ दिवसांत पकडून कठोर कारवाई करावी – समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना

अजय पावसकर

कोल्हापूर : कराड येथे हिंदु एकता आंदोलनाच्या माध्यमातून धर्मजागृतीचे कार्य करणारे प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. अजय पावसकर यांच्यावर २८ जूनला रात्री १०.३० वाजता अज्ञात आक्रमणकर्त्यांनी ५ गोळ्या झाडल्या. सुदैवान श्री. पावसकर यांना एकही गोळी लागली नाही; मात्र त्यांच्यावरील जीवघेणे आक्रमण ही राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची गंभीर स्थिती आणि तीव्रता स्पष्ट करते. श्री. पावसकर यांच्यावर आक्रमण करणार्‍या गुन्हेगारांना पोलिसांनी येत्या ८ दिवसांत अटक करावी, तसेच हे आक्रमण करण्यामागे नेमके कोण आहेत, त्याचा मुख्य सूत्रधार कोण आहे, ते शोधून काढून त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या वतीने येथील विशेष पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांना ३ जुलैला देण्यात आले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *