बांगलादेश आणि पाकिस्तान येथील हिंदूंवरील आणि हिंदु धर्मावरील आघातांच्या घटनांवर एकाही भारतीय नेत्याच्या तळपायाची आग मस्तकात का जात नाही ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
ढाका : शहराच्या शेजारील जिल्हा गाझीपूरमधील कालियाकोईर येथे अज्ञात धर्मांधांनी सार्वजनिक पूजा मंडपातील हिंदूंच्या देवतांच्या ८ मूर्तींची तोडफोड केली. हिंदूंच्या शरद ऋतूत साजरा होणार्या श्री दुर्गापूजा उत्सवासाठी या मूर्ती बनवण्यात आल्या होत्या. कलीकैर कालियाकोईर पोलीस ठाण्याचे सरहाय्यक उपनिरीक्षक झाकीर हुसेन यांनी ही घटना घडल्याचे मान्य केले.
मूर्ती कलाकार शांती गोपाल पॉल यांनी रात्रभर जागून या मूर्ती घडवण्याचे काम केले होते. दुसर्या दिवशी, जेव्हा ते परत कार्यशाळेत आले, तेव्हा त्यांना ८ मूर्तींची तोडफोड झाल्याचे आढळून आले. त्यापैकी श्रीगणेशाच्या २, श्रीलक्ष्मीच्या २, श्रीसरस्वतीच्या २ आणि कार्तिकस्वामींच्या २ मूर्ती होत्या. या घटनेची बातमी कळताच पोलीस अधिकार्यांनी घटनास्थळी भेट दिली.
एक स्थानिक तुम्पा राणी पॉल म्हणाले, यापूर्वी या गावात विध्वंस आणि जाळपोळ होण्याच्या काही घटना घडल्या आहेत; परंतु त्यांची कोणीही नोंद घेतली नाही. परिणामी या विध्वंसाने स्थानिक हिंदु समाजात संताप व्यक्त होत आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात