दैनिक सनातन प्रभातमधील वृत्ताचा परिणाम
मडगाव : धर्मशिक्षणाच्या अभावी हिंदूंकडून जीर्ण झालेली देवतांची चित्रे देवळाच्या बाहेर ठेवण्यात येत असल्यामुळे देवतांची विटंबना होत असल्याची बातमी २ जुलै या दिवशीच्या दैनिक सनातन प्रभातमध्ये छापून आली होती. या बातमीचा परिणाम म्हणून ३ जुलै या दिवशी धर्माभिमानी श्री. प्रकाश नाईक यांनी मंदिराबाहेर टाकण्यात आलेली देवतांची चित्रे गोळा करून त्यांचे विसर्जन केले.
या संदर्भात श्री. नाईक यांना विचारले असता ते म्हणाले मी दैनिक सनातन प्रभातमधील बातमी वाचून हे बघायला येथे आलो. देवतांची चित्रे अशा प्रकारे टाकलेली पाहून खूप वाईट वाटले, म्हणून ही चित्रे नदीत विसर्जन करणार आहे. देवळात प्रतिदिन सेवेसाठी येणार्या पवित्रा बानावली यांनीही तेथील वृक्षाजवळ गोळा करून ठेवलेली देवतांच्या चित्रांची पिशवी श्री. नाईक यांना विसर्जनासाठी दिली.
१५ वर्षांपूर्वी चिखली, वास्को येथे एका व्यक्तीने तिच्या घरातील देवतांची चित्रे रानातील झाडीत टाकून दिली होती. श्री. नाईक आणि त्यांच्या मित्राने त्यावेळीही चित्रे गोळा करून पाण्यात विसर्जित केली होती. ही घटना सांगताना त्यांच्या मनातील चीड आणि त्यांचा देवतांप्रतीचा भाव जाणवत होता. (असे धर्मभिमानी हिंदूच हिंदु राष्ट्राचे खरे पाईक होत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात