मुख्यमंत्र्यांनी केवळ असे बोलण्यापेक्षा केंद्र सरकारला देशभर गोवंश हत्याबंदी कायदा करण्यास भाग पाडावे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
मुंबई : गाय आहे, तर भविष्य आहे, गाय नाही, तर काही नाही, असे उद्गार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे एका कार्यक्रमात काढले. मुंबईत जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनची मेगा बिझनेस कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली आहे. त्या वेळी ते बोलत होते. या परिषदेसाठी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी हेसुद्धा मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की,
१. ज्या गावांमध्ये गायींची संख्या घटली, ज्या ठिकाणी शेतीचे उत्पादन अल्प झाले, त्या ठिकाणी शेतकरी आत्महत्या वाढली. (शेतकरी आत्महत्यांचे हे कारण मुख्यमंत्री केंद्रातील भाजप शासनाला पटवून देऊन पुढील कार्यवाही करण्यासाठी पाठपुरावा घेतील का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
२. गोरक्षण हा धार्मिक विषय नसून ज्या राज्यांमध्ये गायींची संख्या अल्प झाली, त्या राज्यांमध्ये जमिनी मोठ्या प्रमाणावर नापीक झाल्या.
३. महाराष्ट्रातील पाणी वाचवा मोहिमेला जैन समाजाने मोठे साहाय्य केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात