Menu Close

हिंदुत्वनिष्ठ अजय पावसकर यांच्यावरील भ्याड आक्रमणाच्या निषेधार्थ सातारा येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून निवेदन सादर

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

सातारा : सातारा जिल्ह्यातील कराड येथील हिंदू एकता आंदोलनाचे ज्येष्ठ हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते श्री. अजय पावसकर यांच्यावर झालेल्या भ्याड आक्रमणाच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी ४ जुलैला निवेदन दिले. या वेळी हिंदुत्वनिष्ठांनी आक्रमणकर्त्यांना आणि या आक्रमणामागच्या खऱ्यां सूत्रधारांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. हे आक्रमण एकट्या अजय पावसकर यांच्यावरील नसून ते हिंदु धर्मावरील आक्रमण आहे, असे सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

या वेळी श्री. गोविंद गांधी, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, हिंदु महासभा; श्री. दत्ता सणस, सातारा जिल्हा अध्यक्ष, हिंदु महासभा; श्री. निमेश शहा,  सातारा उपतालुका प्रमुख, शिवसेना; श्री. रमेश ओसवाल, सातारा शहर अध्यक्ष, हिंदु महासभा; श्री. सचिन गायकवाड, शिवसेना; श्री. धनराज जगताप, उपाध्यक्ष, सातारा हिंदु महासभा; श्री. हेमंत सोनावणे, हिंदु जनजागृती समिती; श्री. अरविंद ओसवाल, श्री. सरदारजी जे.एस्. लोहिया, श्री. मोहनराव पवार, हिंदु महासभा; श्री. मोहित शहा, शिवसेना; श्री. शिवराज तलवार, धारकरी, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान; श्री. विजय काटवटे, नगरसेवक, भाजप, सातारा आदी उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *