नाशिक येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन
नाशिक : साध्वी प्रज्ञासिंह यांना खोट्या आरोपाखाली ८ वर्षे कारागृहात डांबून त्यांच्यावर अनन्वित अत्याचार करणारे अधिकारी आणि अत्याचार करण्यास भाग पाडणारे राज्यकर्ते यांना कठोर शासन करा, मालेगाव स्फोटाचे अन्वेषणाचेे प्रकरण हे षड्यंत्र असून ते रचणारे सर्व दोषी अधिकारी आणि त्यांना कारवाई करण्यास भाग पाडणारे तत्कालीन काँग्रेसी राज्यकर्ते यांच्या विरोधात कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच नक्षलवादी कारवायांत गुंतलेल्या देहली विश्वविद्यालयाच्या प्रा. नंदिनी सुंदर आणि मानवाधिकार कार्यकर्त्या बेला भाटिया यांवर कारवाई करण्यात यावी, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. शशिधर जोशी यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या वेळी केले.
१. श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीवर धर्मविरोधी रासायनिक लेपन करून देवीच्या मूर्तीशी खेळ करणारे कोल्हापूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी आणि केंद्रीय पुरातत्त्व विभागाचे अधिकारी यांच्यावर गुन्हा प्रविष्ट करावा, अशी मागणी श्रीमती वैशाली कातकाडे यांनी, तर केंद्रशासनाने बंदी घातलेल्या डॉ. झाकीर नाईक यांच्या शाळा चालवण्यास घेणार्यांची सखोल चौकशी करावी. या शाळा शासनाने कह्यात घेऊन चालवाव्यात, अशी मागणी श्री. शिवाजी उगले यांनी केली.
२. या वेळी नाशिकचे निवासी उपजिल्हाधिकारी श्री. रामदास खेडकर यांना निवेदन देण्यात आले. त्यांनी मागण्या योग्य असल्याचे सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात