घारेवाडी (सातारा) : गोरक्षण करणे हा आपला धर्म आहे. हिंदु राष्ट्रात गायी सुरक्षित असतील. हिंदूंना त्यांच्या शौर्याचा इतिहास शिकवण्यात येईल. त्यामुळे शूर तरुण निर्माण होतील, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे पुणे जिल्हा समन्वयक श्री. अभिजित देशमुख यांनी येथील हिंदु एकता आंदोलनाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यशाळेत केले. या वेळी हिंदु एकता आंदोलनाचे पदाधिकारी तसेच सनातन संस्थेचे श्री. चेतन राजहंस उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आरंभी छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी सरसेनापती हंबीराव मोहिते यांचे वंशज श्री. राजेंद्र मोहिते, माजी स्वयंसेवक संघ प्रचारक श्री. चंद्रकांत कुलकर्णी, गणेश महामुनी, राहुल यादव, चंद्रकांत जिरंगे यांनीही मार्गदर्शन केले.
साधू-संतांनी सांगितल्याप्रमाणे वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्र येणारच आहे ! – श्री. विनायक पावसकर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, हिंदु एकता आंदोलन
साधू-संतांनी तसेच हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितल्यानुसार वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्र येणारच आहे. आम्हीही त्यादृष्टीने प्रयत्नशील होणार आहोत.
संविधानिक मार्गाने निधर्मी भारताचे हिंदु राष्ट्र होऊ शकते ! – श्री. चेतन राजहंस
भारत हे स्वयंभू हिंदु राष्ट्र आहे. आजच्या संविधानिक मार्गाने निधर्मी भारताचे पुन्हा हिंदु राष्ट्र होऊ शकते. राज्यघटनेतील कलम ३६८ नुसार हे शक्य आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात