कराड : सांडपाणी आणि घनकचरा यांमुळे मोठ्या प्रमाणात होणारे प्रदूषण, पर्यावरणीय र्हास आदींकडे लक्ष देण्याऐवजी गणेशोत्सवातील तथाकथित प्रदूषणावरून कृत्रिम तलाव वा गणेशमूर्ती दान अशा चुकीच्या संकल्पना राबवून त्याद्वारे होणारी गणेशमूर्तींची विटंबना थांबवावी, या मागण्यांच्या अनुषंगाने ३० जून या दिवशी सातारा येथील सहपालक मंत्री श्री. सदाभाऊ खोत यांना हिंदु जनजागृती समितीकडून निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट, श्री. हेमंत सोनावणे, श्री. मदन सावंत, अनिल कडणे, हिंदु एकता आंदोलनाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री. विनायक पावसकर, हिंदु एकता आंदोलनाचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष श्री. रूपेश मुळे उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात