आग्रा : तेलंगण शासनाने शासकीय खर्चातून १९५ चर्चमध्ये ख्रिसमस राज्य स्तरावर साजरा करण्याचा आणि ख्रिसमसच्या काळात २ लक्ष ख्रिस्त्यांना कपडे वाटण्याचा निर्णय घेतला आहे. धर्मनिरपेक्ष म्हणवणार्या शासनाद्वारा अल्पसंख्यांकांच्या तुष्टीकरणासाठी केल्या जाणार्या जनतेच्या या निधीचा अपव्य रोखावा, तसेच निर्माता संजय लीला भंसाळी यांच्या इतिहासाचा अनादर करणार्या बाजीराव मस्तानी या चित्रपटावर बंदी घालावी, अशा दोन मागण्या असलेले निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्य मंत्री डॉ. राम शंकर कठेरिया यांना १६ डिसेंबर या दिवशी आग्रा येथे देण्यात आले. हिंदु जनजागृती समितीचे स्थानिक कार्यकर्ते श्री. शुभम सोनी, श्री. ठाकुरजी आदी कार्यकर्त्यांनी हे निवेदन केंद्रीय राज्य मंत्री कठेरिया यांना दिले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात