पेजावर मठाच्या विरोधात भडकाऊ भाषण केल्याचा आरोप
काँग्रेसच्या राज्यात धर्मविरोधी कृत्यांच्या विरोधात वैध मार्गानेही कृती केली किंवा विचार मांडले, तरी हिंदुत्वनिष्ठांना त्रास दिला जातो; मात्र राज्यात हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या झाल्या, तरी कोणावरही कारवाई होत नाही ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
बेंगळुरू : उडुपी येथील श्रीकृष्ण मठामध्ये पेजावर श्री विश्वेशतीर्थ स्वामी यांनी आयोजित केलेल्या इफ्तारच्या मेजवानीवर टीका केल्यामुळे येथील हाय ग्राऊंड पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट केला आहे. पोलिसांनी श्री. मुतलिक यांच्या विरोधात धर्म, वंश, जन्म, स्थान, निवास, भाषा इत्यादींच्या आधारावर विविध गटांमध्ये शत्रुत्वाचा प्रसार केल्याविषयी कायदेशीर कारवाई करण्याच्या संदर्भातील गुन्हा प्रविष्ट केला आहे. श्री. मुतालिक यांनी श्री विश्वेशतीर्थ स्वामी यांचा या मेजवानीवरून निषेध केला होता. परत असा प्रकार घडला, तर रक्ताचे पाट वाहतील, असे मुतालिक यांनी म्हटल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
श्री. मुतालिक म्हणाले होते की, उडुपी येथील श्रीकृष्ण मठामध्ये मुसलमानांसाठी इफ्तार आयोजित करणे, हा हिंदु धर्मियांचा अपमान आहे. अशा प्रकारच्या घटनांनी हिंदु समाजाला चुकीचा संदेश जाईल. आम्ही कोणत्याही मंदिरात किंवा मठात इफ्तारची मेजवानी होऊ देणार नाही. त्यासाठी आमचे रक्त सांडले तरी चालेल. (याला विद्वेषी भाषण कसे म्हणता येईल ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात