Menu Close

फेसबुकवरील पोस्टवरुन पश्चिम बंगालमध्ये दंगल

कोलकाता : पश्चिम बंगालमधील २४ परगणा जिल्हयात फेसबुक पोस्टवरुन दोन गटात दंगल उसळली आहे. हिंसक जमावाने कोलकाता व त्याच्या आजूबाजूच्या परिसरातील दुकानांची जाळपोळ केली आणि रेल्वेमार्ग अडवला. यामुळे परिस्थिती अधिकच चिघळली असून बीएसएफच्या ४०० जवानांना पाचारण करण्यात आले आहे. दरम्यान फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका १७ वर्षीय तरुणास अटक करण्यात आली आहे.

फेसबुकवर शुक्रवारी एकाने मोहम्मद पैगंबर यांच्या संदर्भात आक्षेपार्ह मजकूर असलेली पोस्ट टाकली. त्यानंतर दोन गट समोरासमोर आले. व्हॉट्सअॅप व इतर सोशल नेटवर्किंग साईटवर चिथावणीखोर मेसेज व्हायरल झाले. यामुळे हे प्रकरण अधिकच चिघळले. त्याचे लोण कोलकाता व आजूबाजूच्या भागातही पसरले. दोन्ही समाजातील नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. जमावाने दुकान व खासगी वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. यावेळी जमावाला पांगवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांवरही किरकोळ दगडफेक करण्यात आली.

स्त्रोत : दैनिक सामना

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *