उडुपी(कर्नाटक) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनात हिंदूंची मागणी
सरकारने स्वतःहून कृती करणे अपेक्षित असतांना हिंदूंना अशी मागणी करावी लागणे, हे काँग्रेस सरकारला लज्जास्पद आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
उडुपी (कर्नाटक) : येथील बसस्थानकाजवळ हिंदुत्वनिष्ठांच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. यात श्रीराम सेना, हिंदु जनजागृती समिती आदी संघटनांचे ४० हून अधिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. यात श्रीराम सेनेचे श्री. मोहन भट, जिल्हाध्यक्ष श्री. दिनेश, जिल्हा प्रवक्ता जयराम अम्बेकल्लू, हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता दिनेश नायक आणि हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयकश्री. विजय कुमार यांचा सहभाग होता. या वेळी जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले.
नक्षलवाद्यांना साहाय्य करणार्या जेएन्यूमधील प्रा. नंदिनी सुंदर आणि मानवाधिकार कार्यकर्त्या बेला भाटिया यांच्यावर करवाई करावी, हंपी येथील प्रसिद्ध विरूपाक्ष मंदिराचे रक्षण करावे, निरपराध साध्वी प्रज्ञासिंह यांना अटक करून त्यांच्यावर अत्याचार करणार्या अधिकार्यांवर कारवाई करावी आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात