जोधा-अकबर चित्रपटाच्या प्रकरणी पोलिसांनी प्रविष्ट केलेल्या गुन्ह्यांचे प्रकरण !
सांगली : २७ फेब्रुवारी २००८ या दिवशी जोधा-अकबर या चित्रपटात इतिहासाचे विकृतीकरण असल्याने श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला होता. या प्रकरणी पोलिसांनी हिंदुत्वनिष्ठांवर अकारण लाठी आक्रमण केल्याने त्याचे पर्यवसान दंगलीत झाले होते. या वेळी पोलिसांनी श्रीशिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते सर्वश्री हणमंतराव पवार, नितीन चौगुले, अविनाश सावंत, मिलींद तानवडे, अनिल तानवडे, नितीन काळे, हरिदास पडळकर, शाहीर मोहन यादव या आठ जणांच्या विरोधात विविध कलमांखाली गुन्हा प्रविष्ट केला होता. या प्रकरणाचा ४ जुलै या दिवशी निकाल लागला. या प्रकरणी मुख्य न्यायदंडाधिकारी एन्.एच्. मखरे यांनी श्री शिवप्रतिष्ठानच्या आठ कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणी श्री शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांच्या बाजूने अधिवक्ता राजेंद्र शिंपी यांनी काम पाहिले.
या प्रकरणी पोलिसांनी भादवि ३५३, १४३, १४७, १४८, तसेच अन्य कलमांन्वये गुन्हा प्रविष्ट केला होता. यात प्रामुख्याने मल्टीप्लेक्स थिएटर बंद पाडणे, चित्रपटगृहाची हानी करणे, पोलिसांवर आक्रमण करून शासकीय कामात अडथळा आणणे, तसेच अन्य आरोप ठेवण्यात आले होते. या प्रकरणी पोलीस प्रत्यक्षात कोणताच थेट पुरावा सादर करू शकले नाहीत, पोलीस अधिकाऱ्यांच्या साक्षीत तफावत होती, तसेच पोलिसांनी सादर केलेले अनेक पुरावे अपुरे होते. यामुळे न्यायाधिशांची वरील सर्वांची मुक्तता केली. या प्रकरणी अधिवक्ता राजेंद्र शिंपी यांनी नि:स्वार्थी बुद्धीने, तसेच अतिशय तळमळीने श्रीशिवप्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांच्या बाजूने युक्तिवाद केला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात