Menu Close

पश्चिम बंगाल धुमसतेच आहे, हिंसाचारात हिंदु वृद्धाचा मृत्यू

गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या हिंसाचारातील पहिला बळी

पश्चिम बंगालमधील हिंसाचार थांबण्याची चिन्हे नसून गुरुवारी या हिंसाचारामुळे एका वृद्धाला जीव गमवावा लागला आहे. बसिरहाट येथे ६५ वर्षीय वृद्धाचा जमावाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने परिस्थिती पुन्हा चिघळली आहे.

बसिरहाटमधील भिबला येथे राहणारे कार्तिक घोष हे बुधवारी दुपारी बाजारातून खरेदी करुन घरी परतत असताना त्यांच्यावर तीक्ष्ण हत्यारांनी हल्ला करण्यात आला. यात जखमी झालेल्या कार्तिक घोष यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र गुरुवारी त्यांचा मृत्यू झाला. नॉर्थ परगणा येथे गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या दंगलीत मृत्यू झाल्याची ही पहिली घटना आहे.

रविवारी ११ वीत शिकणाऱ्या एका मुलाने फेसबुकवर धार्मिक स्थळाविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकले होते. यावरुन उत्तर परगणा जिल्ह्यात हिंसाचार सुरु झाला. दोन्ही गटांकडून घरावर, दुकानांवर हल्ले करण्यात आले होते. बुधवारी रात्रीपासून परिस्थिती नियंत्रणात आल्याने सुरक्षा यंत्रणांना काही अंशी दिलासा मिळाला होता. मात्र गुरुवारी घोष यांच्या मृत्यूचे वृत्त येताच जमाव पुन्हा रस्त्यावर उतरला.

स्त्रोत : लोकसत्ता

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *