Menu Close

भारत मुस्लिमांवर अत्याचार करणारा देश : वीणा मलिक

पाकिस्तान : भारतातील प्रसिद्ध रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’ची माजी स्पर्धक राहिलेली पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक काम करत असलेल्या पाक न्यूज या पाकिस्तानी वाहिनीवरील ‘ब्रेकिंग न्यूज विथ वीणा मलिक’ या न्यूज शोमधून वीणाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इस्रायल दौऱ्यावर टीका केली आहे.

तिच्या शोमधून पंतप्रधान नरेंद्र मोदीं विरोधात आगपाखड करताना मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू हे दोन मोठे नेते हजारो मुस्लिमांच्या आयुष्याची वाट लावण्यास कारणीभूत असल्याचे तिने म्हटले आहे. पाकिस्तानी वाहिन्यांवर भारत-इस्त्रायल मैत्री ही मुस्लिमां विरोधातील ‘हिंदू-यहुदी’ युती असल्याचे दाखविले जात असताना वीणाने तिच्या शोमधून भारत हा मुस्लिमांवर अत्याचार करणारा देश असल्याचे म्हटले आहे.

ती म्हणतेय, ‘भारत आणि इस्रायल हे दोन्ही देश मुस्लिमांच्या रक्ताचे तहानलेले आहेत. या दोन्ही देशांची मानसिकता एक सारखीच आहे. भारत काश्मिरमधील निष्पाप-निशस्त्र काश्मिरी जनतेवर हिंसाचार करत आहे, तर इस्रायल पॅलेस्टाइनमधील जनतेचे हाल करत आहे.” वीणाच्या या शोचा व्हिडिओ पाक न्यूज या वाहिनीच्या ट्विटर हॅण्डलवरही शेअर करण्यात आला आहे.

संदर्भ : महाराष्ट्र टाइम्स

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *